‘या’ अभिनेत्रीचा झाला 49 व्या वर्षी ‘साखरपुडा’, होणार्‍या नवर्‍यासोबतचा ‘रोमॅन्टिक’ फोटो केला शेअर

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री पूजा बेदी आपल्याला सगळ्यांना माहितच असेल. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या पूजाचा एकही चित्रपट चालला नाही. या चित्रपटात पूजा आमिरसोबत लिपलॉक करताना दिसली होती. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी पूजाचा एकही चित्रपट बॉक्सऑफीसवर कमाल दाखवू शकला नाही. तिने एकून ८ चित्रपटात काम केले पण सगळे फ्लॉप झाले. ती चित्रपटामुळे जरी चर्चेत नसली तरी सध्या ती एका कारणामुळे चर्चेत आहे.

View this post on Instagram

Unfiltered togetherness… ❤

A post shared by Pooja Bedi (@poojabediofficial) on

पूजा बेदी पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकण्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तिने वयाच्या ४९ व्या वर्षी मॅनेक कॉन्ट्रक्टरसोबत साखरपुडा केला आहे. लवकरच हे दोघे लग्न करणार असल्याची माहिती समजली आहे. सध्या हे कपल गोव्यामध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. दोघांनी सोशल मीडियावर गोव्याच्या किनाऱ्यावरचे फोटो शेअर केले आहे.

View this post on Instagram

Loving it!!! @anmoljewellers completes my look for tonight

A post shared by Pooja Bedi (@poojabediofficial) on

पूजाच्या अफेरची चर्चा बरीच रंगली होती. पाच जणांशी तिचे नाव जोडले गेले. पूजा बेदीने १९९४ मध्ये फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले यांचे नाते १२ वर्ष टिकले त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांना उमर आणि आलिया नावाची दोन मुले आहे.

View this post on Instagram

Red is the colour for the day merry xmas!!!

A post shared by Pooja Bedi (@poojabediofficial) on

मॅनेक हे गोव्याचेच आहे आणि हे दोघे एकाच शाळेत असल्यामुळे त्यांची पहिल्यापासूनच मैत्री होती. त्यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे. पूजाने ‘जो जीता वही सिकंदर’, ‘लुटेरे’, ‘आतंक ही आतंक’, ‘फिर तेरी कहानी याद आई’ अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.

View this post on Instagram

"Once upon a time" ….. isn't that how all fairy tales start?

A post shared by Pooja Bedi (@poojabediofficial) on

 

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like