उमर अब्दुल्लांसोबत फोटो शेअर करत पूजा बेदीनं लिहिला ‘असा’ मेसेज, लोकांनी सुनावलं ‘खरं-खोटं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री पूजा बेदी सध्या सिनेमांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच अ‍ॅक्टीव असते. सध्या तिची एक पोस्ट सोशलवर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये उमर अब्दुल्ला बद्दल उल्लेख आहे. पूजानं जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यासोबत फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं ट्विट करताना फोटोसोबत मेसेजही लिहिला आहे ज्यामुळं ती ट्रोल होत आहे. तिनं लिहिलं आहे की, निराधार कारणांसाठी ते आपले अविस्मरणीय दिवस लॉकमध्ये घालवत आहेत यावर विश्वास बसत नाही.

पूजाला ट्रोल करताना एकानं लिहिलं की, पूजाजी झोपेतून जागे व्हा. ते लॉकअपमध्ये नाहीत. एकानं लिहलं की, ते आत आहेत म्हणूनच काश्मीरमध्ये शांतता आहे. पूजा लहानपणीच चुकीच्या संगतीला लागली होती. त्यामुळंच चुकीचं बोलत आहे.

पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं विषकन्या, जो जीता वही सिकंदर, लुटेरे, आतंक ही आतंक शक्ति यासारंख्या अनेक सिनेमात काम केलं आहे. याशिवाय ती झलक दिखला जा, नच बलिए, बिग बॉस 2 आणि बिग बॉस 5 मध्येदेखील दिसली आहे. बॉलिवूड स्टार कबीर बेदी आणि प्रसिद्ध डान्सर प्रोतिमा बेदी यांची ती मुलगी आहे.