पूजा भट्टने केले लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे कौतुक !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे मुंबईमधील अनेक गणेशोत्सव मंडळांनी लहान आकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करता ‘आरोग्यत्सव’ साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे अभिनेत्री पूजा भट्ट हिने कौतुक केले आहे. हा अत्यंत प्रेरणादायी निर्णय असल्याचे म्हटले आहे.

खरंच हा एक कौतुकास्पद निर्णय आहे. तुम्ही घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांना प्रेरणा मिळेल. आपण सर्वांनी यांच्यापासून प्रेरणा घेत अशी मदत करायला हवी. जय जय महाराष्ट्र माझा. अशा आशयाचे ट्विट करुन पूजाने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे कौतुक केले आहे. तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ यंदाच्या वर्षी 11 दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवणार आहे. सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर असतानाच राज्यासमोर असणारे संकट लक्षात घेता मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.