Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाणच्या लॅपटॉपमधला ‘गबरू शेठ’ कोण ? फोटो अन् ऑडिओ क्लिपमुळं पुन्हा एकदा नवा गौप्यस्फोट, प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोहरादेवीत जाऊन दर्शन घेणाऱ्या राठोड यांच्या समर्थकांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. आपल्यावरील आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा दावा त्यांनी केला. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेले वनमंत्री संजय राठोड काल जनतेसमोर आले. जवळपास १५ दिवस बेपत्ता असलेल्या संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पूजा राठोड प्रकरणात अरुण राठोड, अनिल चव्हाण ही दोन नावं याआधी समोर आली आहेत. यानंतर आता गबरू शेठ हे नवं नाव समोर आलं आहे. त्यामुळे गबरू शेठ नेमकं कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूला वनमंत्री संजय राठोड आपलं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप करत असताना दुसऱ्या बाजूला पूजा चव्हाणच्या लॅपटॉपमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, संजय राठोड यांनी पोहरादेवीच्या दर्शनानंतर आपण निर्दोष असल्याचा, आपल्यावरील आरोप निराधार असल्याचा दावा केला. पण नव्या फोटो आणि ऑडिओ क्लिपमुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. गबरूच्या नावाच्या केकचे फोटो या लॅपटॉपमध्ये सापडले आहेत. हा गबरू पूजाला आपल्या हातानं केक भरवतानाचा फोटोही त्यात आहे. विशेष म्हणजे केक भरवणाऱ्या गबरू शेठच्या हातात शिवबंधन आणि काळा दोरा दिसत आहे. त्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये पूजा स्वतः वनमंत्री असं नाव लिहिलेला केक कापताना दिसत आहे. त्या केकवर संजय राठोड यांचा फोटो आहे. पुढच्या दोन फोटोंमध्ये पूजा आणि संजय राठोड एकत्र दिसत आहेत. यातलं ठिकाण, बॅकग्राऊंड सारखंच आहे. दोघांच्या डोक्यावर फरची टोपी आहे. पूजा आणि गबरू यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. त्यात तुमचा नंबर रिजेक्ट लिस्टमधून काढला, कुलू मनालीला आणि जम्मू काश्मीरला जाऊ, असा संवाद आहे.