Pooja Chavan Suicide Case : ‘साहेब, असल्या गलिच्छ गोष्टीचं कधीही समर्थन करणार नाहीत’; चित्रा वाघ म्हणाल्या – ‘मी शरद पवारांना भेटणार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव सध्या खूप चर्चेत आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार चांगलेच कोंडीत सापडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठोड यांच्यासंदर्भात कोणता निर्णय घेतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. या दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ”ठाकरे सरकारमध्ये मंत्री वाचला पाहिजे राज्यातील गोर गरिबांच्या मुली मेल्या तरी चालतील” अशा तीव्र शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास असल्याचे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे.

चित्रा वाघ यांनी गुरुवारी पूजा हिने आत्महत्या केलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण राहत होती ती रुम सील करण्यात आली आहे अशी माहिती दिली. यानंतर त्यांनी वानवडी पोलिसांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी सवांद साधताना पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्य सरकारवर व संजय राठोड यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले चित्रा वाघ
वानवडी पोलीस निरीक्षक ज्या भाषेत बोलले असे वरिष्ठ अधिकारी पण बोलले नाही. साधा प्रश्न १७ दिवस एफआयआर का नाही? ते म्हणाले ,’लेखी आदेश नाही. पोलीस लेखी आदेशाची वाट बघत आहेत. सुमोटो अंतर्गत का नाही गुन्हा दाखल केला ? तसेच पोलिसांना चालवणारा बाप कोण आहे? आणि हत्यारा संजय राठोडला वाचवण्यासाठी तुम्ही सगळं पणाला लावणार का? असे प्रश्न चित्रा वाघ यांच्याकडून उपस्थित करण्यात आले आहे.

संजय राठोड यांनी पोहोरादेवी येथे जमवलेल्या गर्दीचाही चित्रा वाघ यांच्याकडुन चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. संजय राठोड यांच्या पोहोरादेवी येथील दौऱ्यानंतर बंजारा समाजातील पाच महंतांपैकी एक महंत असलेले कबीर दास महाराज, ज्यांनी पोहरा देवीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्या घरातील ६ जणांना कोरोनाची झाला असून ५ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी चित्रा वाघ यांच्याकडुन करण्यात आली आहे. तुम्ही एवढी माणसे जमवली म्हणजे तुम्ही निर्दोष आहात, असा त्याचा अर्थ होत नाही असेसुद्धा चित्रा वाघ म्हणाल्या.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा वेगळी आहे. ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे सगळ्या महिला वर्गांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडची गच्छंती करावी असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. तसेच मी स्वत: शरद पवार यांच्यासोबत काम केलंय. साहेब, असल्या गलिच्छ गोष्टीचं कधीही समर्थन करणार नाहीत. पण, त्यांना आणि मुख्यमंत्र्यांना माहिती देणारे कोण आहेत, हेच पुण्याचे पोलीस. जे पोलीस साधा एफआयआरही करत नाहीत. त्यामुळे, जेवढी काही डिटेलींग आहे, ती घेऊन आम्ही शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार. मला पूर्ण खात्री आहे, हे दोन्ही नेते या घाणेरड्या, गलिच्छ प्रकाराला पाठिंबा देणार नाहीत, असा विश्वास चित्रा वाघ यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

प्रकरण दाबण्यासाठी पोलीस बसवले आहेत
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात एकूण १२ ऑडिओ क्लिप्स समोर आल्या आहेत. हे सगळे फोन अरुण राठोड यांच्या फोनवर करण्यात आले होते. परंतू, त्याच्या फोनमधला डेटा रिकव्हर का नाही? पुणे पोलिसांनी काही चेक केले का? कसं लपवून, झाकून ठेवायचं हे पुणे पोलिसांनी सिद्ध केले आहे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्या भाषेत बोलले आहेत त्यावरून ते पूजा प्रकरण दाबण्यासाठी बसवले आहे. १७ दिवस उलटून देखील एफआयआर का नाही? या सध्या प्रश्नावर ते म्हणाले ,’लेखी आदेश नाही. पोलीस लेखी आदेशाची वाट बघत आहेत. यावेळी पोलिसांनी या प्रकरणात सुमोटो अंतर्गत का नाही गुन्हा दाखल केला? असे प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केले आहेत.

वार नसताना डॉक्टर का आला
राज्य महिला आयोगाला कोणताही अध्यक्ष नाही. राष्ट्रीय महिला आयोगाला अहवाल पाठवण्यात आला. जोपर्यंत संजय राठोडची चौकशी होत नाही तोपर्यंत हा अहवाल पूर्ण होऊ शकत नाही. मध्यरात्री १०० नंबरला कॉल करण्यात आला. मुलगी बिल्डिंगवरून खाली पडली आहे. त्यानंतर सकाळी ७ ते ७.३० वाजता कॉल करून अरुण राठोडकडून संपूर्ण माहिती घेऊन पोलिसांना दिली. तो कॉल त्यांनी पब्लिकमध्ये आणावा. संपूर्ण आवश्यक माहिती देऊनसुद्धा कोणतीही अ‍ॅक्शन घेण्यात आली नाही. तसेच ज्या डॉक्टराचा वार नसताना तो का आला? त्याने पूजाला ट्रीटमेंट का दिली? असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. पुणे पोलिसांनी कोणतीही मदत मागितली नाही, सांगितले नाही. ते आले तपास केला आणि निघून गेले. आणि नेमकंच दुसऱ्या दिवशी डॉक्टरची आई आजारी पडावी, आणि अरुणच्या घरी चोरी व्हावी केवढे हे योगायोग असे चित्रा वाघ यांनी सांगितले आहे.