×
Homeताज्या बातम्याPooja Chavan Suicide Case | 'पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन...

Pooja Chavan Suicide Case | ‘पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चीट द्या’, बंजारा महंतांची पुणे पोलिसांकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pooja Chavan Suicide Case | संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील शिवसेनेचे आमदार संजय राठोड (Shivsena MLA Sanjay Rathod) यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) संजय राठोड यांच्यावर कोणताही गुन्हा (FIR) दाखल झालेला नाही. तसेच पूजा हिचा मृत्यू (Death) हा आत्महत्या (Suicide) किंवा अपघाती मृत्यू (Accidental Death) झालाय, असा रिपोर्ट पुणे पोलिसांनी (Pune Police) दिला आहे.

 

बंजारा समाजाचे महंत (Banjara community Mahant) आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाने (All India Banjara Seva Sangha) पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पुणे पोलिसांकडून मिळालेल्या कागदपत्रानुसार संबंधित तरुणीचा मृत्यू हा अपघाती किंवा आत्महत्या असल्याचं नमूद केलं आहे, असा दावा पुणे पोलिसांची भेट घेतलेल्या बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने केला आहे. या प्रकरणात राठोड यांना क्लीन चीट (Clean Cheat) द्या, अशी मागणी देखील या शिष्टमंडळाने (Delegation) पुणे पोलिसांकडे केली आहे.

 

पूजा चव्हाण प्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) जो तपास पोलिसांकडून आतापर्यंत करण्यात आला आहे त्या तपासाचा अहवाल द्या, अशी मागणी शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्तांना भेटून केली.
यानंतर पुणे पोलिसांकडून काही कागदपत्रे शिष्टमंडळाला देण्यात आली.
या कागदपत्रामध्ये पूजा चव्हाण हिचा मृत्यू अपघाती किंवा आत्महत्या असल्याचं म्हटलं आहे, असा दावा या शिष्टमंडळाने केला आहे.
या शिष्टमंडळामध्ये पोहरादेवीचे (Pohardevi) 6 महंत बाबू सिंह महाराज (Babu Singh Maharaj),
कबीरदास महाराज (Kabir Das Maharaj), सुनील महाराज (Sunil Maharaj), जीतू महाराज (Jeetu Maharaj),
यशवंत महाराज (Yashwant Maharaj), शेखर महाराज (Shekhar Maharaj) आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार (All India Banjara Seva Sangha President Shankar Pawar) यांचा समावेश होता.

काय आहे प्रकरण ?
7 फेब्रुवारी 2021 ला पूजा चव्हाणनं पुण्याच्या वानवडी (Wanwadi) परिसरातील राहत्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती.
या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं.
या प्रकरणानंतर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
28 फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा दिला. पूजा चव्हाण आत्महत्येचा पुणे पोलीस तपास करत आहेत.

 

Web Title :- Pooja Chavan Suicide Case | banjara mahanta demand clean chit to shiv sena leader sanjay rathod in pooja chavan suicide case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News