Pooja Chavan Suicide Case : ‘त्या’ क्लीपमधील आवाज अरुण राठोडचा नाही ?

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपनं आरोप केला होता की, मंत्री संजय राठोड यांच्या सोबत असलेल्या प्रेमसंबंधातून तिनं हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणी भाजपकडून पुरावा म्हणून काही ऑडिओ क्लीप्सही देण्यात आल्या आहेत. यातील आवाज कोणाचा आहे याचा तपास सध्या सुरू आहे. या प्रकरणी अरुण राठोड या तरूणाचं नावही प्रखरतेनं पुढं येताना दिसत आहे.

असं असताना आता ग्रामस्थांनी असा दावा केला आहे की, या क्लीपमधील आवाज हा अरुण राठोड याचा नाहीये. या प्रकरणी बोलताना ग्रामस्थ म्हणतात, पूजा चव्हाण आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. त्यात अरूण राठोड याचं नाव येतं आहे. परंतु क्लीपमधील आवाज हा अरुण राठोडचा नाही. वडिलांचा पाय फ्रॅक्चर झाल्यानं तो 2 दिवस बाहेर गेला आहे. मोलमजुरी करून उगरनिर्वाह करणारं त्याचं कुटुंब आहे. अरुण हा सुशिक्षित मुलगा आहे. त्याला पुण्याला जाऊन जास्त दिवस झाले नाहीत. पूजा चव्हाण आणि अरुण राठोड हे वर्गमित्र असल्यानं त्यांची ओळख होती असंही त्यांनी सांगितलं आहे.

इतकंच नाही तर व्हायरल क्लीपमधील आवाज हा अरुण राठोडचा आवाज नाही, त्यामुळं त्यावर शंका आहे. ही दुर्दैवी घटना आहे. त्यात चांगल्या नेत्यांना ओढणं योग्य नाही. संजय राठोड यांची नाहक बदनामी झाली आहे. काहीही पुरावा नसताना फक्त ऑडिओ क्लीपवरून बदनामी करणं योग्य नाही. पोलीस चौकशीतून सत्य समोर येईलच. विनाकारण बंजारा समाजाची बदनामी करून नये अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

कोण आहे अरुण राठोड
अरुण सुभाष राठोड हा वनविभागात नोकरीला आहे. तो बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे कुटुंबासह राहत होता. काही दिवसांपूर्वीच अरुण पूजा सोबत पुण्यात रहायला गेला होता. ऑडिओ क्लीपमध्ये अरुण राठोड याला कथित मंत्र्यानं सूचना दिल्या होत्या. परंतु हा आवाज अरुण राठोड यांचा होता का याबाबत पुष्टी नाही. पोलिसांनी या प्रकरणी अरुणची चौकशी सुरू केली आहे. ज्यावेळी पूजानं आत्महत्या केली तेव्हा अरुण राठोड तिथच उपस्थित होता. आम्हाला फक्त आवाज ऐकायला आला असं त्यानं पोलिसांना सांगितलं.