Pooja Chavan Suicide Case | पोलिसांकडून संजय राठोडांना ‘क्लिन चिट’ देण्याचा संबंधच नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुण्यातील वानवडी (wanwadi pune) भागात पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) केल्याच्या घटनेमुळे, राज्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पुणे पोलिसांकडे (Pune Police) जबाब नोंदविला आहे. त्यामुळे पोलिसांकडून संजय राठोड यांना ‘क्लिन चिट’ मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणावर (Pooja Chavan Suicide Case) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या विधानामुळे संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

‘आमची कोणा विरोधात काही तक्रार नाही’, असे पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
त्यामुळे संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात असल्याची जोरदार चर्चा रजकीय वर्तुळात सुरु झाली.
मात्र, याच दरम्यान संजय राठोड प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलं.
शिवसेना (Shivsena) आमदार संजय राठोड प्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत.
त्यामुळे क्लिन चिट (Clean chit) देण्याचा संबंधच नाही, असं मोठं वक्तव्य वळसे पाटील यांनी पुण्यात केल. ते पत्रकारांशी बोलत होते.

 

पुणे पोलिसांनी आई-वडिलांचा जबाब नोंदवला

पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पुणे पोलिसांकडे जबाब नोंदवला असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आमची कोणा विरोधात काही तक्रार नाही.
असे त्यांनी म्हटल्याची माहिती झोन पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (Deputy Commissioner of Police Namrata Patil) यांनी दिली आहे.
तसेच या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु, आता पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याने संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.

Web Title : Pooja Chavan Suicide Case | no clean chit to sanjay rathod in pooja chavan suicide case from pune police dilip walse patils big statement

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime | कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गनिमी कावा संघटनेच्या अध्यक्षासह इतरांविरूध्द गुन्हा

Pune Crime | कर्वेनगर, साधु वासवानी चौक अन् खडकी परिसरात लुटमारीच्या घटना