Pooja Chavan Suicide Case : ‘माझ्या पोटचा गोळा गेला…’, पूजा चव्हाणच्या आईची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. या प्रकरणामधील विविध फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सुद्धा कोणावर अजून कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र आता पूजाचं अख्खं कुटुंबच महाराष्ट्रासमोर आलं असून त्यांनी आपल्या आपला आक्रोश व्यक्त केला आहे.

पूजा चव्हाणच्या आईची पहिली प्रतिक्रिया

‘माझ्या पोटचा गोळा गेला…माझी मुलगी कशी होती हे मला माहीत आहे…ती धाडसी होती…मात्र तिची आता बदनामी थांबवा…पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतील,’ असे बोलत पूजा चव्हाण हिच्या आईकडून माध्यमांना पहिली प्रतिक्रिया देण्यात आली. हि प्रतिक्रिया देताना मुलीविषयी होत असलेल्या चर्चेमुळे आईला वेदना होत असलेल्या वेदना अश्रुरुपाने बाहेर पडत होत्या.

कारवाईला का होत आहे उशीर ?

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणात संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्यात फोनवर झालेल्या कथित संभाषणाच्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. तसेच राठोड आणि पूजा चव्हाण यांचे एकत्रित फोटोसुद्धा समोर आले आहेत. पूजा चव्हाणच्या आत्महत्येबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे पण कोणतीही कारवाई मात्र होताना दिसत नाही आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा संजय राठोड यांना तपास पूर्ण होईपर्यंत मंत्रिपदावरून दूर होण्याच्या सूचना देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे हे सरकार अंसवेदनशील आहे का अशी चर्चा राज्यभर रंगू लागली आहे. त्यामुळे येत्या काळात तरी ह्या प्रकरणावर कारवाई होणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.