Pooja Chavan Suicide case | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा अद्याप तपास सुरु, पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण; म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीने वानवडी परिसरातील हेवन पार्क (heaven park wanwadi pune) इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide case) शिवसेनेचे तत्कालीन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, प्रसारमाध्यांमध्ये पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide case) तिच्या आई-वडिलांनी कोणाविरोधात तक्रार नसल्याचा जबाब दिल्याचे वृत्त आले होते. यावर स्पष्टीकरण देताना पुणे पोलिसांनी (Pune Police) सांगितले की, अद्याप या प्रकरणाचा तपास सुरु असून क्लोजर रिपोर्ट (Closure report) दिलेला नाही असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Helicopter Crashes in Jalgaon | जळगाव जिल्ह्यातील चोपडा शिवारात हेलिकॉप्टर कोसळले; एकाचा मृत्यू, महिला पायलट गंभीर जखमी

अद्याप अहवाल सादर केला नाही

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांकडून तपास पूर्ण केल्याचा अहवाल अद्याप सादर करण्यात आलेला नाही. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु असून अद्याप कोणालाही निर्दोषत्व बहाल करण्यात आलेले नाही. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना निदोषत्व बहाल करण्यात आल्याचे वृत्त समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आले होते, हे वृत्त निराधार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Amruta Fadnavis | ‘हर मोड़ पर गड्ढे-तालाब..म्हणत अमृता फडणवीसांचा अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला

तपास बंद केलेला नाही – पोलीस उपायुक्त नम्रता पाटील

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणाचा तपास बंद (क्लोजर रिपोर्ट) करण्यात
आलेला नाही. पूजा चव्हाणच्या पालकांनी सुरुवातीला त्यांची कोणाविरोधात तक्रार नसल्याचे जबाबात म्हटले
होते, असे परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (Deputy Commissioner of Police
Namrata Patil) यांनी सांगितले आहे.

Pooja Chavan Suicide case | Pooja Chavan suicide case still under investigation, Pune police explanation; Said …

दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी वानवडी पोलिसांनी (Wanwadi police) पूजाच्या पालकांचा नव्याने जबाब
नोंदविला आहे. या जबाबात त्यांनी त्यांची कोणाविरोधात तक्रार नसल्याचे म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक
दीपक लगड (Deepak Lagad) यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

संजय राठोडांना ‘क्लिन चिट’ देण्याचा संबंधच नाही

आमची कोणा विरोधात काही तक्रार नाही, असे पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी दिलेल्या जबाबात म्हटले
आहे. त्यामुळे संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात असल्याची जोरदार चर्चा रजकीय वर्तुळात सुरु
झाली. मात्र, याच दरम्यान संजय राठोड प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)
यांनी भाष्य केलं. शिवसेना (Shivsena) आमदार संजय राठोड प्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत.
त्यामुळे क्लिन चिट देण्याचा संबंधच नाही, असं मोठं वक्तव्य वळसे पाटील यांनी पुण्यात केलं. ते पत्रकारांशी
बोलत होते.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pooja Chavan Suicide case | Pooja Chavan suicide case still under investigation, Pune police explanation; Said …

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update