Pooja chavan Suicide Case | पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा, संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – pooja chavan suicide case | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja chavan Suicide Case) तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या (Pune Police) हाती महत्त्वाचा पुरावा (Important evidence) लागला आहे. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. या सर्व संभाषणाचं रेकॉर्डिंग (Phone recording) पोलिसांच्या हाती लागलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पूजाच्या मोबाईल मध्ये सापडलेल्या या संभाषणांमधील एक संभाषण 90 मिनिटं चाललं होतं, अशी सूत्रांची माहिती आहे. यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja chavan Suicide Case) संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

बंजारा भाषेत संभाषण

इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, मृत तरुणीच्या फोन कॉल्सच्या रेकॉर्डिंग वरून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या आधी ती ज्या व्यक्तीच्या संपर्कात होती, ज्याच्याशी बोलत होती, ती व्यक्ती संजय राठोड हीच असल्याचे प्रथमदर्शनी माहिती समोर येत आहे. त्या दोघांमध्ये बंजारा भाषेत (Banjara language) संभाषण झालं होतं. त्याचा अनुवाद घेतला जात आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण ?

7 फेब्रुवारी 2021 ला पूजा चव्हाणनं पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणानंतर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 28 फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा दिला. पूजा चव्हाण आत्महत्येचा पुणे पोलीस तपास करत आहेत.

Web Title : pooja chavan suicide case pune police finds calls between sanjay rathod four five days before her death

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

GST Restrictions Relaxations | करदात्यांना दिलासा ! जुलैमध्ये 1.16 लाख कोटी जीएसटी संकलन; करदात्यांना सीएच्या प्रमाणपत्राची गरज नाही?

Mulethi Face Pack | सैल त्वचा बनेल कसदार, फक्त एकदा ‘हा’ फेस पॅक लावा; सुरकुत्याच्या समस्येपासून मिळेल ‘आराम’

Android Phone | सावधान ! 27 सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोनमध्ये Gmail, YouTube आणि Google सुद्धा नाही चालणार

Shivsena | शिवसेनेची सामनातून भाजपवर टीका; ‘राज्यात भाजपचा ‘अंतकाळ’ जवळ आलाय’

Pune Rural Police | पुणे- सातारा महामार्गावर पट्टेरी वाघाची कातडी विक्री करणारी टोळी गजाआड