Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आम्ही कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही – पुणे पोलिस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असून, यात अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. किंवा गुन्हा दाखल नाही, असे परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी स्पष्ट केले आहे. काही चुकीची माहिती पसरवली जात आहे, याबाबत पोलिसांना विचारण्यात आले होते.

पंधरा दिवसांपूर्वी (दि. 7 फेब्रुवारी) वानवडी परिसरात 22 वर्षीय पूजा चव्हाण हिने पहिल्या मजल्यावरून आत्महत्या केली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पूजा चव्हाण हिने आत्महत्या केली. यावेळी तिच्यासोबत अरुण राठोड आणि तिचा चुलत भाऊ असे दोघेजण होते. त्यांनीच रिक्षातून तिला रुग्णालयात नेले होते. पण उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. दरम्यान या आत्महत्या प्रकरणात एका मंत्र्याचे नाव आल्याने हे प्रकरण राज्यात गाजत आहे. त्यानंतर याप्रकरणची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे. पण याप्रकरणी पूजा हिच्या आईवडिलांनी आमची कोनाविरोधात तक्रार नसल्याचे स्टेटमेंट लिहून दिले आहे. त्यातच पोलीस महासंचालक व राष्ट्रीय महिला आयोगाने देखील याप्रकरणी काय तपास केला याचा अहवाल मागितला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अहवाल सादर केला. आता याप्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यातच पोलीसांच एक पथक तिच्या नातेवाईक व इतरांचे जबाब घेत आहे.

पण माध्यमामधून सतत वेगवेगळ्या बातम्या दिल्या जात आहेत. त्यात पूजा हिच्यासोबत असणाऱ्या त्या दोन तरुणांना अटक केली, असेही सांगितले जात होते. तर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण पोलिसांनी असे काही नसल्याचे पुन्हा एकदा सांगितले आहे.

आज देखील काही ठिकाणी अरुण राठोड याला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे. पण याबाबत परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी आम्ही कोणाला ताब्यात घेवलेले नाही. तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.