पूजा हेगडेचा ‘जबरा’ फॅन ! तिच्यासाठी 5 दिवस झोपला रस्त्यावर (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चित्रपटातील कलाकारांचे चाहते आणि त्यांचे भन्नाट किस्से आपण अनेकदा पाहीले आणि ऐकले असतील आता असाच किस्सा अभिनेत्री पूजा हेगडे हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा चाहता पूजाला भेटण्यासाठी चक्क पाच दिवस रस्त्यावर झोपला. अशा जबरा फॅनला पाहून पूजा भावुक झाली.

View this post on Instagram

लड़के वाले #baarati

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja) on

त्याचे झाले असे की, पूजाच्या सौदंर्यावर आणि तिच्या अभिनयावर प्रेम करणारा एक चाहता तिला भेटण्यासाठी खास मुंबईत आला होता. पण नेमकी पूजा तेव्हा मुंबईत नव्हती. पूजाला भेटण्याचा त्याने निश्चय केला होता. तिला भेटण्यासाठी तो सलग पाच दिवस मुंबईच्या थंडीत रस्त्यावर झोपला. पूजा परत मुंबईत आल्यावर तिने या चाहत्यांची भेट घेतली. आपल्याविषयी या चाहत्यांचे प्रेम पाहून पूजा भलतीच भावुक झाली. पण तिला भेटण्यासाठी चाहत्याला पाच दिवस रस्त्यावर राहवं लागलं या गोष्टीचं खूप वाईट वाटलं.

या चाहत्याचं नाव भास्कर राव. त्याने पूजा करिता खास चॉकलेट्स देखील आणले होते. पूजाने तिच्या चाहत्याचा हा व्हिडीओ इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. आणि म्हटले आहे की, ‘ भास्कर राव मुंबईत येण्यासाठी आणि माझी पाच दिवस वाट पाहण्यासाठी धन्यवाद.’ ‘मला या गोष्टीने आनंदच झाला पण एका गोष्टीचं दुःखही आहे की, मला भेटण्यासाठी माझ्या चाहत्यांना एवढा त्रास सहन करावा लागला. माझ्यासाठी माझ्या चाहत्यांनी रस्त्यावर झोपावं असं मला कधीच वाटणार नाही. तुम्ही सर्व माझी ताकद आहात. माझं तुम्हा सर्वांवर प्रेम आहे.’

पूजाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर पूजा आपल्या चाहत्याला भेटली त्याची विचारपूस केली याबद्दल देखील नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एका युझरने ‘जर मीही असं केलं तर तू मला भेटशील का’ असा प्रश्न विचारला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like