Pooja Khedkar Case | वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला 21 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Pooja Khedkar Case | Controversial IAS trainee Pooja Khedkar granted interim protection from arrest till April 21; Supreme Court decision

दिल्ली: Pooja Khedkar Case | वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकरी पूजा खेडकर यांचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहेत. पूजा खेडकरवर २०२२ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पात्रता मिळविण्याकरिता बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने पूजा खेडकरला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यावर सुनावणी पार पडली. दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे संरक्षण वाढवले आहे. तिला अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याची मुदत मंगळवारपर्यंत (२१ एप्रिल) पर्यंत वाढवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने २१ एप्रिल रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.

पूजा खेडकरने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना केवळ घटनात्मक संस्थेसोबतच नव्हे तर समाज आणि संपूर्ण देशाच्या फसवणुकीचे उत्कृष्ट उदाहरण असल्याची टिप्पणी केली होती. या प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींची चौकशी करणे आवश्यक आहे. तिचे वडील उच्च पदावर असल्याने प्रभावशाली व्यक्तींशी संगनमत होण्याची शक्यता असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले होते.

Total
0
Shares
Related Posts