Pooja Vastrakar Longest Six | पूजा वस्त्राकरने मारला यंदाच्या विश्वचषकातील सर्वात लांब सिक्सर; पाहा व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pooja Vastrakar Longest Six | भारतीय महिला संघामधील अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकरने मोठा रेकॉर्ड केला आहे. आजच्या भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सामन्यात भारताचा 6 धावांनी पराभव झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी कठीण झालं आहे. या सामन्यात भारताची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकरने आयसीसी महिला विश्वचषक 2022 चा सर्वात लांब सिक्स मारला आहे. (Pooja Vastrakar Longest Six)

 

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली. सुरूवातीलाच पहिले दोन धक्के लवकर बसले. 28 धावांपर्यंतच दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले होते त्यानंतर यास्तिका भाटियाने कर्णधार मिताली राजसह डाव पुढे नेत शतकी भागीदारी केली. हरमनप्रीत कौरनेही आवश्यक सामन्यात अर्धशतक ठोकले, परंतु यादरम्यान पूजा वस्त्राकरने 34 धावांच्या खेळीत स्पर्धेतील सर्वात लांब षटकार ठोकला. (Pooja Vastrakar Longest Six)

पूजाने 49 व्या षटकामध्ये पाचव्या चेंडूवर तिने जाग्यावरून 81 मीटरचा गगनचुंबी षटकार खेचला. पूजाने या षटकारासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्लो ट्रायॉन आणि भारताच्या स्मृती मानधनाच्या 80 मीटर लांब षटकाराला मागे टाकले आहे.

 

दरम्यान, भारताचे पाच सामन्यात दोन विजय आणि तीन पराभवांसह चार गुणांसह भारत चौथ्या स्थानावर कायम आहे.
भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांचे पुढील दोन उर्वरित सामने जिंकावे लागतील.
टीम इंडियाचा पुढचा सामना 22 मार्चला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्याचवेळी 27 मार्चला संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

 

Web Title :- Pooja Vastrakar Longest Six | watch pooja vastrakar smashed longest six in wc against australia

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा