भिकार्‍यानं दाखवलं ‘आभाळा’ एवढं मन, ‘कोरोना’ रिलीफ फंडामध्ये दिले 90 हजार रूपये

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना महामारीने संपूर्ण जग हादरवून टाकले आहे. या गंभीर संकटात लोक एकमेकांना मदत करण्यात व्यस्त आहेत. अशीच एक बातमी तामिळनाडूच्या मदुराईमधून समोर आली आहे जी लोकांसाठी एक मोठी प्रेरणा बनली आहे. भिकारी असलेल्या पूल पांडियन यांनी कोरोना राज्य मदत निधीमध्ये 90 हजार रुपये दान देऊन एक उदाहरण मांडले.

न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना पूल पांडियन यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने यांना सामाजिक कार्यकर्त्याची पदवी दिली आहे, यामुळे मला खूप आनंद झाला. याआधीही मे महिन्यात त्यांनी जिल्हाधिकारी टी.जी. विनय यांना गरीब मुलांसाठी दहा हजार रुपयांची देणगी दिली होती.

तमिळनाडूच्या मदुरै येथील रहिवासी पूल पांडियन हे खूप गरीब आहेत, लोकांकडून मागून ते जगतात, परंतु कोरोनाच्या या संकटात त्यांनी आपल्या बचतीतून 90 हजार रुपये राज्याच्या कोविड -१ रिलीफ फंड मध्ये दान केले आहेत. सोशल मीडियावर पूल पांडियनचे या आश्चर्यकारक कार्याबद्दल कौतुक केले जात आहे.

पूल पांडियन हे तुतीकोरिन जिल्ह्यातील राहणारे आहेत. त्यांनी गरिबीमुळे भीक मागायला सुरूवात केली. आणि ते कधीही एका ठिकाणी नही राहिले. भीक मागून पैसे गोळा करून जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यासाठी येतात. त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय शाळांना अनेकदा देणगी दिली आहे.

कोरोना विषाणूने मनुष्यांना कठीण परिस्थितीत जगण्याचा एक नवीन मार्ग शिकविला आहे. पूल पांडियानसारखे लोक संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्रोत आहेत, जे फार कमी संसाधनामध्ये कोणतीही तक्रार न करता पूर्ण भक्तीभावाने समाजाची सेवा करत आहेत.