Poona Gujarati Bandhu Samaj | पूना गुजराती बंधू समाजच्या वतीने कोंढव्यात महोत्सव, समाजातील 4 ते 5 हजार जणांचा सहभाग

पुणे : पूना गुजराती बंधू समाज (Poona Gujarati Bandhu Samaj) या पुण्यातील गुजराती समाजातील अग्रगण्य संस्थेच्या वतीने शहरातील गुजराती समाजातील व्यक्तींसाठी रविवार १९ मार्च रोजी प्रथमच एका महोत्सवाचे आयोजन नंदू भवन, कोंढवा (Kondhwa) येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत करण्यात आले होते. या महोत्सवात सर्व गुजराती समाज बांधवाना परिवारा सह निःशुल्क प्रवेश ठेवण्यात आला होता. या महोत्सवाचे उदघाटन स्वामी नारायण पंथाचे त्यागानंदजी व शाश्त्रनयनजी महाराज यांच्या हस्ते व पूना गुजराती बंधू समाजचे अध्यक्ष नितीन भाई देसाई (Nitin Bhai Desai) यांच्या उपस्थितीत करण्यात आले. (Poona Gujarati Bandhu Samaj)
या महोत्सवात दिवसभरात शहरातील सुमारे ४ ते ५ हजार गुजराती समाजातील लोकांनी उपस्थिती लावली होती. त्या सर्वांसाठी सकाळी नाष्टा व दुपारी सुरुची भोजनाची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. तसेच या महोत्सवात पुण्यातील विविध गुजराती समाजाच्या ४० संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या स्वागत- सत्कार समारंभाचे आयोजन पूना गुजराती बंधू समाज या संस्थेचे अध्यक्ष नितीन भाई देसाई, उपाध्यक्ष भरतभाई शहा (Bharatbhai Shah), मॅनेजिंग ट्रस्टी राजेश शहा (Rajesh Shah), जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी नैनेश नंदू (Nainesh Nandu) , खजिनदार राजेंद्र शहा (Rajendra Shah) व सर्व ट्रस्टी यांनी केले होते. (Poona Gujarati Bandhu Samaj)
या मेळाव्या मध्ये संपूर्णतः गुजरात मय वातावरण निर्माण करण्यात आले होते. विशेषतः महिलांसाठी गुजराती पद्धतीची मेहंदी, टॅटू, हेअरबॅंड्स, बांगड्या इत्यादी विनामूल्य उपलब्द करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला होता.
सदर महोत्सवाला भेट देणाऱ्या सर्वाना PGKM विद्याधाम च्या शेजारी २ लाख चौरस फूट जागेवर पूना गुजराती
बंधू समाज (PGBS) कडून उभारण्यात येत असलेल्या ‘जयराज कन्व्हेन्शन सेंटर – गुजरात भवन व स्पोर्ट्स सेंटर’
या भव्य प्रकल्पाची व त्या ठिकाणी उपलब्द होणाऱ्या सोयी सुविधा याबद्दल माहिती देण्यात आली.
या वास्तूचे निर्माण पूर्णत्वास आले आहे. पुढील एक वर्षात त्याचे उदघाटन होईल व सभासदांसाठी वापरास
सुरवात होईल अशी माहीती पूना गुजराती बंधू समाज या संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी राजेश शहा यांनी दिली.
Web Title : Poona Gujarati Bandhu Samaj | festival in Kondhwa on behalf of Poona Gujarati Bandhu Samaj, participation of 4 to 5 thousand people from the community
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Nashik Crime News | नाशिकमध्ये तोल जाऊन गिर्यारोहकाचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू