Poona Hospital And Research Centre | पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व जिन कुशल सेवा मंडळाकडून आयोजित रक्तदान शिबीरात 97 रक्तदात्यांनी केले रक्तदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Poona Hospital And Research Centre | १५ जुलै २०२२ रोजी स्व. श्री. राकेश देवीचंद जैन यांच्या सोळाव्या स्मृतिदिना निमित्त पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व जिन कुशल सेवा मंडळ यांच्या तर्फे ४० व्या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. (Poona Hospital And Research Centre)

 

या शिबीराचे उद्घाटन पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष श्री. देवीचंद जैन आणि विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात रक्तदानाची गरज वाढत असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे यासाठी आवाहन केले. राकेश जैन यांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या या रक्तकेंद्रा मुळे आज अनेकांना जीवदान मिळाले आहे. (Poona Hospital And Research Centre)

 

कोरोना व डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर रुग्नांना आपत्कालीन सेवा, प्लाज्मा, प्लेटलेट्स व रक्ताचे इतर घटकांची उपलब्धता राकेश जैन मेमोरिअल ब्लड सेंटरने केली. या शिबीरात ९७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 

रूग्णालयाचे अध्यक्ष देवीचंद जैन, उपाध्यक्ष डाह्याभाई शाह, मॅनेजिंग ट्रस्टी राजकुमार चोरडिया,
जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी पुरूषोत्तम लोहिया, विश्वस्त राजेशभाई शाह, नैनेश नंदू, भबुतमल जैन,
पूना हॉस्पिटलचे सी ई ओ डॉ. रवींद्रनाथ व जिन कुशल सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र लुंकड व
कार्यकारी परिवार इत्यादी उपस्थित होते.

 

Web Title :- Poona Hospital And Research Center | Blood Donation Camp by Poona Hospital and Research Center and Jin Kushal Seva Mandal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘माझ्याकडे असे कलाकार, तुम्हाला कळणारही नाही…’

 

Pune Crime | पुण्यातील टिळक रोडवर भरचौकात 2 गटात तुफान राडा; कोयत्याचे वार

 

NCP Chief Sharad Pawar | आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी होणार ? शरद पवारांचे सूचक वक्तव्य (व्हिडीओ)