Poonam Pandey | ‘बेशरम रंग’ गाण्यावर थिरकली पूनम पांडे; कातील अदांनी चाहते घायाळ…

पोलीसनामा ऑनलाईन | पठाण सिनेमातील ‘बेशरम रंग’ हे गाणे सध्या चांगलेच वादात सापडले आहे. या गाण्यात दीपिका पादुकोनने परिधान केलेल्या बिकीनीवरून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. दीपिकाने या गाण्यात भगव्या रंगाची बिकीनी परिधान केली आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषद तसेच इतर हिंदू संघटनांनी यावर आक्षेप घेतला असून पठाण चित्रपट बंदीची मागणी केली जात आहे. यातच आता या गाण्यावर अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आणि पूनम पांडे (Poonam Pandey) हिचा या गाण्यावरील डान्स हा प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे.

अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) ही तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या हावभावांनी ती नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये असणारी तिची उपस्थिती नेहमीच लक्ष वेधून घेत असते. नुकताच बिग बॉस अभिनेता प्रतीक सहजपालच्या वाढदिवसाच्या पार्टीत तिने हजेरी लावली होती. यावेळी तिने (Poonam Pandey) बेशरम रंग गाण्यावर डान्स केला ज्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

 

सोमवारी प्रतिकने त्याच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. टीव्ही क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी प्रतिकच्या पार्टीला हजेरी लावली होती. यात अभिनेत्री पूनम पांडेच्या डान्सने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या पार्टीत पूनम ‘बेशरम रंग’ या गाण्यावर थिरकली. यात तिने डीप नेक टॉप परिधान केला आहे.

पूनमच्या (Poonam Pandey) या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी चांगल्याच कमेंट्स केल्या आहेत.
एकाने लिहले आहे की “दीपिकाच्या ऐवजी खरं तर हिलाचं या गाण्यात घ्यायला हवे होते.”
तर दुसऱ्याने लिहले आहे “बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींपेक्षा ही चांगली आहे,” अशा शब्दात त्यांनी पूनमचे कौतुक
केले आहे. एकाने लिहले आहे “दीपिकापेक्षा चांगला डान्स हिने केला आहे.”
त्यामुळे एकंदरच तिच्या या डान्सवर नेटकऱ्यांकडून समिश्र प्रतिसाद पहायला मिळत आहे.

Web Title :- Poonam Pandey | actress model poonam pandey dancing on beshram rang in pratik sehejpal birthday party

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Winter Session -2022 | महाविकास आघाडीची आजही ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…

Devendra Fadnavis | ‘चिंता करू नका, भाजप ग्रामपंचायतींच्या निकालात बाजी मारेल’ – देवेंद्र फडणवीस

Google for India 2022 | ‘ट्रांजक्शन सर्च फीचर’पासून ‘डिजिलॉकर’पर्यंत, गुगलचे CEO सुंदर पिचाई यांच्या मोठ्या घोषणा