Poonam Pandey | अभिनेत्री पूनम पांडेने घेतला मोठा निर्णय; म्हणाली – ‘मी यापुढे…’

पोलीसनामा ऑनलाइन : Poonam Pandey | बॉलीवूड अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओज मुळे चर्चेत असते. एवढेच नाही तर पूनम तिच्या अभिनयापेक्षा वादग्रस्त वक्तव्यामुळे ओळखली जाते. पूनमला अनेकदा तिच्या वक्तव्यामुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला. आता याबाबतच पूनमने एक मोठा निर्णय घेतला आहे. पूनमने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने यावर भाष्य केले आहे. (Poonam Pandey)

पूनम पांडे बॉलीवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती अनेकदा विविध विषयांवर स्पष्टपणे तिचे मत मांडत असते. तर अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. आता मात्र पुनमने या वादग्रस्त गोष्टींपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “मी यापुढे वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणार आहे. मी केवळ माझ्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहे. मला असं वाटते की एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला मिळणारी प्रसिद्धी ही केवळ पंधरा मिनिटांसाठी असते. तो वाद सुरू असेपर्यंत लोक तुमची चर्चा करतात. पण त्यानंतर ते तुम्हाला विसरतात. पण त्या उलट तुम्हाला तुमच्या कामामुळे जास्त ओळखले जाते. मी बऱ्याचदा काहीही बोलते. पण मला असे वाटते की कधी कधी गप्प बसणे देखील खूपच चांगले आहे. खर सांगायचं तर मी आता अनेक गोष्टीचे मॅनेजमेंट करायला शिकले आहे. मला आता चांगल्या संधी मिळत आहेत त्यासाठी मी देवाचे खूप खूप आभार मानत आहे”. (Poonam Pandey)

पूनम नुकतीच कंगना रणौतच्या वादग्रस्त शो ‘लॉकअप’ मध्ये दिसून आली होती.
या शोमध्ये ती करणवीर बोहरासोबत दिसली होती.
शो बाहेर पडल्यानंतर दोघांचे बाँडिंग चांगलेच वाढल्याचे दिसून आले. पूनमने 2013 साली आलेल्या ‘नशा’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

Web Title :-Poonam Pandey | actress poonam pandey big decision interview says fame from controversy stay only for 15 minutes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra MLC Election Results | ‘सत्यजीत तांबे जिंकले तरीही तो भाजपचा विजय नसेल…;’ – जयंत पाटील

Pune Crime News | ‘आरोपी पकडा अन् बक्षीस मिळवा’, कोयता गँगच्या दहशतीमुळे पुणे पोलिसांची अनोखी योजना

Maharashtra MLC Election Results | सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार नाहीत…; मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले कारण