पूनम पांडेला दिवाळी गोव्यातच साजरी करावी लागणार; याचिकेवर 21 नोव्हेंबरला होणार सुनावणी

मडगाव : पोलीसनामा ऑनलाइन –    वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे (poonam-pandey) आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांनी त्यांना मिळालेला जामीन रदद् करावा म्हणून मडगावच्या सत्र न्यायालयात सादर केलेल्या अर्जावर आता 21 नोव्हेंबरला (poonam-pandey-celebrate-diwali-goa-too-bail-plea-be-heard-november-21) सुनावणी होणार आहे. अर्जाचा निकाल लागेपर्यंत दोघांनाही गोवा सोडता येणार नाही. त्यामुळे लग्नानंतरची पहिली दिवाळी आता दोघांनाही गोव्यातच साजरी करावी लागणार आहे. पूनम पांडे हिने आपला पहिला ‘करावा चौथ’ गोव्यामध्येच साजरा केला होता.

गुरुवारी हा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एडगर फेर्नांडिस यांच्यासमोर सुनावणीस आला असता, पांडे यांच्या वकिलाने अर्जदार सम्राट भगत यांच्या अधिकाराला आव्हान देणारे निवेदन सादर केले. हे निवेदन दाखल करून घेत न्या. फेर्नांडिस यांनी ही सुनावणी 21 तारखेपर्यंत तहकूब केली. सध्या पूनम आणि तिचा पती सॅम हे दोघे आता बाणावली येथील एका हॉटेलात राहत आहेत. त्या दोघांना सहा दिवस काणकोण पोलीस स्थानकावर हजेरी देण्याची जी अट घातली होती, ती हजेरी लावण्याची मुदत गुरुवारी संपली. पालोळे येथे वास्तव्यास असताना पुनमने तो पॉर्न व्हिडिओ शूट केला होता. त्यानंतर या प्रकरणी गदारोळ माजल्यानंतर त्यांनी आपले बस्तान सिकेरी येथील फोर्ट आग्वादा येथे हलविले होते. दरम्यानच्या काळात पूनमने आपले करावा चौथचे फोटोही आपल्या इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केले होते.

पूनम हिला काणकोण न्यायालयाने जो जामीन मंजूर केला आहे तो रद्द करावा, यासाठी भगत यांनी जो अर्ज दाखल केला आहे, त्याला पूनमच्या वकिलांनी हरकत घेताना या प्रकरणात जलस्त्रोत खात्याच्या अभियंत्यांनी तक्रार दाखल केल्याने भगत हे स्वतःला तक्रारदार म्हणवून घेऊ शकत नाहीत. त्यांना हा अर्ज करण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्याचप्रमाणे एकदा मिळालेला जमीन रद्द करायचा असल्यास एकतर जामिनाच्या अटींचे उल्लंघन करावे लागते किंवा वस्तुस्थिती वेगळी आहे हे पटवून देण्यासाठी ठोस कारणे द्यावी लागतात असे या निवेदनात म्हटले आहे. भगत यांच्यावतीने अॅड धर्मेश वेर्णेकर यांनी हा अर्ज करताना पांडे हिला जामीन देताना न्यायालयाने तो व्हिडिओ पाहिला नव्हता. तसेच ज्या उपकराने हा व्हिडिओ शूट केला ती उपकरणे जप्त करायची बाकी आहेत, या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असे म्हटले होते.