‘त्यानं मला जनावरासारखं मारलं…’, लग्नानंतर अवघ्या 14 दिवसातच पूनम पांडेचा पतीला सोडण्याचा निर्णय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओंमुळं कायमच धुमाकूळ घालणारी व चर्चेत राहणारी आणि नुकतीच विवाहबद्ध झालेली अभिनेत्री पूनम पांडे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत येताना दिसत आहे. याचं कारण म्हणजे तिचं लग्न आहे. 14 दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे सोबत लग्न केलेली पूनम पांडे आता घटस्फोटाच्या मार्गावर आहे.

View this post on Instagram

❤️

A post shared by Poonam Pandey Bombay (@ipoonampandey) on

पूनम पांडेनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हनीमूनला गोव्यात असताना पती सॅम बॉम्बेनं तिला मारहाण केली असं पूनमनं तक्रारीत म्हटलं आहे. यानंतर गोवा पोलिसांनी सॅमला अटक केली. सॅम दुसऱ्याच दिवशी जामीनावर बाहेर आला.

मारहाणीच्या घटनेनंतर पूनमनं हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी हे नातं जपण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आता मला सॅमकडे परत जायचं नाही असं पूनमनं म्हटलं आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना पूनम म्हणाली, “त्यानं माझा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आता मी मरणार असं मला त्यावेळी वाटलं. त्यानं माझ्या चेहऱ्यावर मारलं, माझे केस ओढले. माझं डोकं बेडच्या कॉर्नरवर आपटलं. कसाबसा मी माझा जीव वाचवून पळाले. हॉटेल स्टाफनं पोलिसांना बोलवलं आणि ते त्याला घेऊन गेले. यानंतर मी पोलिसात तक्रार दिली.”

पुढे बोलताना पूनम म्हणाली, “मी आणि सॅम 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. या 3 वर्षात त्यानं मला अनेकदा मारहाण केली. मला हॉस्पिटलमध्ये जायलाही भाग पाडलं आहे. तो खूप जास्त पजेसिव्ह आहे.” असंही ती म्हणाली.

पूनम म्हणते, मी त्याच्याकडे परत जाणार नाही ज्यानं तुम्हाला जनावरासारखं मारलं त्याच्याकडे परत जाणं योग्य निर्णय असूच शकत नाही.

पूनम आणि सॅम यांच्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर 10 सप्टेंबर 2020 रोजी सॅम आणि पूनम यांनी प्रायव्हेट सेरेमनीत लग्न केलं. चाहत्यांना सरप्राईज देत त्यांनी सोशलवर अनेक फोटो शेअर केले होते. 27 जुलै रोजी लॉकडाऊनमध्ये त्यांनी साखरपुडा केला होता.

पूनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं नशा, द जर्नी ऑफ कर्मा आणि आ गया हिरो अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like