पूनम पांडेनं शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांच्यावर केली ‘क्रिमिनल’ केस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा विरोधात पोलिसांनी FIR दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर आता अभिनेत्री पूनम पांडेनं मुंबई हाय कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. पूनमनं 2019 साली Armsprime Media सोबत केलेल्या एक करारानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली. ही कंपनी एक अ‍ॅप बनवणार होती. ज्याच्यातून होणाऱ्या नफ्याचा एक हिस्सा पूनमला दिला जाणार होता.

पूनमनं सांगितल्यानुसार, जेव्हा पूनमला हे समजलं की, नफ्याच्या शेअरींगमध्ये फरक करण्यात आला आहे तेव्हा तिनं हे कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं. या कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर पडताच तिला प्रायव्हेट नंबरवर कॉल्स यायला सुरुवात झाली. यात तिला वेगवेगळ्या विनंत्या केल्या जाताना दिसल्या. पूनमचं म्हणणं आहे की, तिनं याबाबत पोलिसांत तक्रार केली परंतु राज कुंद्रांविरोधात तक्रार दाखल करून घेण्यास त्यांनी नकार दिला.
यानंतर तिनं कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला.

देश सोडूनही फरक पडला नाही
रिपोर्टनुसार पूनम तीन महिन्यांसाठी देशाबाहेर गेली होती. तिला वाटलं की, सर्वकाही ठिक होईल. तिनं आपला नंबरही बदलून पाहिला. परंतु यानं मात्र काहीच फरक पडला नाही.

पूनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं नशा, द जर्नी ऑफ कर्मा आणि आ गया हिरो अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.