शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्याविरूद्ध मुंबई हायकोर्टात पोहचली पूनम पांडे, केले ‘हे’ गंभीर आरोप

मुंबई : मॉडल आणि अभिनेत्री पूनम पांडेने बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी सौरभ कुशवाहच्या विरूद्ध मुंबई हायकोर्टात तक्रार दाखल केली आहे. पूनम पांडेने आरोप केला आहे की, राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीने गैर कायदेशीर प्रकारे तिचे व्हिडिओ आणि फोटोंचा वापर केला आहे. पूनमने हा आरोप केला आहे की, या कंटेटचा वापर दोघांमधील कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर करण्यात आला.

मात्र, राज कुंद्रा आणि सौरभ कुशवाह यांनी पूनमचे हे आरोप फेटाळले आहेत आणि म्हटले आहे की, त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही. पूनम पांडेने राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी सौरभ कुशवाहची कंपनी आर्म्सप्राइम मीडियासोबत एक डील साईन केली होती. ही कंपनी पूनम पांडेचे अ‍ॅप सांभाळत होती. पूनमने दावा केला की, दोघांमध्ये झालेली ही डील आठ महिन्यांपूर्वी संपली होती, परंतु कंपनीने यानंतर सुद्धा कंटेंटचा वापर केला आहे.

राज कुंद्राच्या कंपनीने चोरले व्हिडिओ
पूनम पांडेने आरोप केला आहे की, राज कुंद्रा कंटेंटचा वापर करून पैसे कमावत आहे. तिने म्हटले की, मागील सहा महिन्यांपासून काही लोक कॉल करून अश्लील बोलत आहेत. आर्म्सप्राइम कंपनी माझे अ‍ॅप दाखवत होती. मी कॉन्ट्रॅक्ट खुप कमी काळासाठी ठेवले होते, कारण मला त्यामध्ये काहीतरी फसवणूक जाणवली होती. काही काळानंतर मी कॉन्ट्रॅक्ट संपवले. त्यानंतर सुद्धा मागील आठ महिन्यांपासून ते माझे व्हिडिओ चोरत आहेत. मी राजला कॉल आणि मॅसेज-मेल करून व्हिडिओ चोरण्यासाठी रोखले.

आर्थिक तंगीतून जात आहे राज कुंद्रा?
पूनमने पुढे म्हटले, पण आता मला धमक्या मिळत आहेत. मला जाणून घ्यायचे आहे की, ते माझे व्हिडिओ का चोरत आहेत. जर ते आर्थिक तंगीतून जात असतील, तर मी त्यांच्यासाठी पैसे जमवू शकते. पण, माझं कंटेट चोरू नका. हे प्रकरण आता हायकोर्टात सुरू आहे. माझी बाजू मजबूत आहे. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. मी न्यायासाठी विनंती केली आहे, आणि मला माहित आहे मी केस जिंकेन.