खुशखबर ! आगामी ६ महिन्यात केंद्रीय विश्वविद्यालयामध्ये होणार ‘६०००’ प्राध्यापक पदांची भरती

मोदी सरकारचा मोठा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मोदी सरकारने दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक निर्णय घेतले. त्यातच सरकारने प्राध्यापकांनाही मोठी खुशखबर दिली आहे. मोदी सरकार पुढील ६ महिन्यात केंद्रीय विद्यापीठात प्राध्यापकांसाठी जवळपास ६ हजारांपेक्षा जास्त पदांची भरती करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

देशातील सर्व उच्च शैक्षणिक संस्थामध्ये पुढील सहा महिन्यात प्राध्यापकांची भरती करा असा आदेश मानव संधान विकास मंत्रालयाने सगळ्या विद्यापीठांना दिले आहेत. देशातील अनेक डिम विद्यापीठात जवळपास ३५ ते ४० पद रिक्त आहेत. हे सर्व पद सहा महिन्यात भरण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सरकारने देशातील सर्व विध्यापीठाच्या कुलगुरूंना हि रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले आहेत.

यासंबंधी बोलताना केंद्रीय मानवसंधान मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे कि, आतापर्यंतचा सरकारचा हा सर्वात स्पष्ट आदेश आहे. कारण या आदेशात सरकारने कर्मचाऱ्यांना शोधण्यापर्यंतचे सर्व वेळापत्रक दिले आहे. युजीसीच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०१८ पर्यंत देशातील ४० केंद्रीय विद्यापिठात शिक्षकांचे १७७२५ पद होते. त्यातील ६१४१ पद रिक्त आहेत. त्यामुळे प्राध्यापकांच्या अभावामुळे शिक्षणाची गुणवत्ता कमी होत चालली आहे. हि गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.