पूनम पांडे खरंच प्रेग्नंट आहे का ? अ‍ॅक्ट्रेसनं सांगितलं सोशल मीडियावरील वायरल बातमीचं सत्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडल पूनम पांडेने 2020 ला आपले वेडिंग इअर निवडले आणि लाँग टर्म बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत विवाह केला. अ‍ॅक्ट्रेस लग्नानंतर पतीसोबत गोवा ट्रिपवर आहे. या दरम्यान ती न्यूड शूटबाबत कंट्रोव्हर्सीतसुद्धा अडकली होती. आता अशा बातम्या येत आहेत की, पूनम पांडे प्रेग्नंट आहे. यावर नुकत्याच एक इंटरव्ह्यूत पूनमने रिअ‍ॅक्टसुद्धा केले आहे आणि यास केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

पूनम पांडेने नुकतेच स्पॉटबॉयला दिलेल्या इंटव्ह्यूत प्रेग्नंसीचे वृत्त फेटाळले आहे. पूनमने म्हटले की, जर यामध्ये काही सत्य असेल तर मी स्वत: याबाबात घोषणा करेन.

काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक ठिकाणी न्यूड शूट केल्याने पूनम पांडेविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. सध्या तिला मुंबईत येण्याची परवानगी मिळाली आहे.

प्रेग्नंसीच्या रिपोर्टनुसार, अशी बातमी आली होती की, पूनम 6 आठवड्यांची प्रेग्नंट आहे आणि डॉक्टरांनी याबाबत कन्फर्म केले होते. पण पूनमने आपल्याकडून स्पष्ट केले आहे की, तिच्या प्रेग्नंसीबाबत अफवा पसरवली जात आहे आणि जर असे काही असेल तर मी घोषणा करेन.

लग्नाच्या एक आठवड्यानंतर झाले होते भांडण
पूनम पांडेने 10 सप्टेंबरला सोशल मीडियाद्वारे याबाबत घोषणा केली होती की, तिने सॅम बॉम्बेशी विवाह केला आहे. पण लग्नाच्या एक आठवड्यानंतरच पूनमने आपला पती सॅमवर मारहाणीचा आरोप केला होता आणि पोलिसात तक्रार केली होती. मात्र, नंतर दोघांमध्ये समझोता झाला होता.