गोव्यात न्यूड व्हिडीओ शूट करणाऱ्या पूनम पांडेची सुटका ! जामीन मिळाला परंतु….

पणजी : वृत्तसंस्था –  बॉलिवूड ( Bollywood) अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे ( Poonam Pandey) आणि तिचा पती सॅम बॉम्बेला ( Sam Bombey) गोव्यात न्यूड व्हिडीओ ( Nude Video) शूट केल्यानं अटक करण्यात आली होती. अटकेच्या दुसऱ्याच दिवशी दोघांचीही सुटका झाली आहे.गोवा कोर्टाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम आणि सॅम बॉम्बे दोघांनाही प्रत्येकी 20 हजार रुपये भरावे लागतील. दोघांनी गोव्याबाहेर जाण्याची मुभा नाही. पुढील सहा दिवस दररोज पोलीस ठाण्यात येऊन हजेरी द्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळाला असला तरीदेखील गोव्याबाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.पूनम पांडे हि तिच्या हनिमूनसाठी गोव्यात गेली होती. परंतु त्या ठिकाणी तिने न्यूड व्हिडीओ शूट केला होता.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यात याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर 5 नोव्हेंबरला पूनम आणि सॅमला गोवा पोलिसांनी अटक केली. आज सकाळी दोघांनाही गोवा कोर्टात हजर करण्यात आलं. जामिनावर त्यांची सुटका झाली आहे. विशेष म्हणजे तिचा हा न्यूड व्हिडीओ सरकारी ठिकाणी शूट करण्यात आला होता. गोव्यामधील पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर शूट करण्यात आला. या व्हिडीओवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सध्या कोविडच्या काळात धरणावर जाण्यासाठी सामान्य माणसाला बंदी असताना अशा प्रकारच्या शूटिंगला कशी परवानगी दिली जाते, असा आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर उत्तर गोवा पोलिसांनी सिकरी येथील पंचतारांकित हॉटेलमधून अटक केली आहे.

पोलिसांनी IPC 292 नुसार कारवाई केली आहे. त्याचबरोबर गोव्यातील काणकोण पोलिसातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. दोघंही व्हिडीओ शूट करताना घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान, पूनम पांडे पहिल्यांदाच वादात अडकली नाही, ती कॉन्ट्रोव्हर्सी क्वीनच आहे. अनेकदा तिच्या वादग्रस्त विधानांमुळे ती चर्चेत आली आहे.२०११ च्या वर्ल्डकपवेळी देखील तिने सोशल मीडियावर आपले सेमी न्यूड फोटो पोस्ट करत या फोटोंद्वारे मी भारतीय संघाला प्रेरित करत आहे असं म्हटलं होतं. त्यामुळे इतरांसाठी मोठा गुन्हा असलेली हि गोष्ट तिच्यासाठी फार मोठी नाही.