‘वादग्रस्त’ मॉडल पूनम पांडेनं अटकेच्या बातम्यानंतर शेअर केला व्हिडीओ, सांगितलं सर्वकाही ‘सत्य’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नेहमीच चर्चेत असणारी मॉडेल पूनम पांडे आणि तिच्या एका साथिदाराला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पूनम पांडे कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय फिरण्यासाठी बाहेर गेली होती. त्यामुळे मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रविवारी रात्री तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. या सर्व प्रकरणानंतर आता पूनम पांडे हिने एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये तिनं आपल्या चाहत्यांना सर्वकाही खरे सांगितले आहे. दरम्यान तिच्या सोबत असलेला व्यक्ती तिचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगण्यात येत आहे.

https://www.instagram.com/p/CAC2UBAghOv/?utm_source=ig_embed

पूनम पांडे हिने आपला व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये तिने म्हटले आहे की, मित्रांनो मी ऐकले आहे की काल मला अटक करण्यात आली. खरं तर काल रात्री मी तीन मॅरेथॉन चित्रपट पाहिले. पुढे म्हणाली की, काल रात्री मी तीन चित्रपट एकत्र पाहिले. खूप मजा आली. मला काल रात्रीपासून कॉल येत आहेत की मला अटक करण्यात आली आहे आणि मी हे बातमीमध्ये देखील वाचले आहे. मित्रांनो माझी काळजी करू नका, मी माझ्या घरात आहे. मी ठीक आणि सेफ आहे. काही सामान आणण्यासाठी मी काल सायंकाळी बाहेर गेले होते. मला अटक झालेली नाही, असं पूनम पांडेने व्हिडिओद्वारे सांगितले आहे.

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी मुंबईसह देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. मरीन लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावलेल्या नाकाबंदीमध्ये पुनम पांडे आणि तिचा सहकारी सॅम अहमद बीएमडब्ल्यू कारने जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले होते. पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता बाहेर फिरण्याबाबत त्यांना योग्य उत्तरे देता आली नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्यांची गाडी ताब्यात घेतली असून दोघांनाही नोटीस देऊन सोडण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.