पूनम पांडेने आपल्या चाहत्यांना दिला आणखी एक गोड धक्का
मडगाव : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनयापेक्षा सातत्याने वादग्रस्त मुद्द्यांवरून चर्चेत राहणाऱ्या पूनम पांडेने चाहत्यांना गुपचूप लग्न उरकून धक्का दिला होता. त्यानंतर आता पूनमने आपल्या चाहत्यांना आणखी एक गोड धक्का दिला आहे. गोव्याच्या वास्तव्यात पूनम सहा आठवड्यांची गर्भवती असून, ती आई होणार आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
https://www.instagram.com/p/CHLNhp-pTXM/?utm_source=ig_web_copy_link
चापोली धरणावर चित्रित करण्यात आलेल्या अश्लील व्हिडिओमुळे पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर उत्तड गोव्यातील सिकेरी येथील हॉटेलवरून पूनम आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली होती. त्यांना जामीन मिळाला होता, पण काणकोण न्यायालयाने विविध अटी घातल्याने त्यांना गोवा सोडण्यास मनाई करण्यात आली होती.
https://www.instagram.com/p/CG12_pDJtM8/?utm_source=ig_web_copy_link
मात्र, शुक्रवारी (दि.१३) काणकोण न्यायालयाने पूनम आणि तिच्या पतीला मुंबईला जाण्यास परवानगी मान्य केली असून, शनिवारी (दि. १४) रात्री मुंबईला रवाना झाले. पूनमने वार्का येथील डॉ. आर. जी. प्रभुगावकर यांच्याकडे तपासणी केली असता, त्यांनी ती सहा आठवड्यांची गर्भवती असून, तिला विश्रांती घेण्याची गरज असल्याचा दाखल दिला होता.
https://www.instagram.com/p/CGsfOqMp6zb/?utm_source=ig_web_copy_link
पूनमने आपल्या अवस्थेचा दाखला देत तसेच सॅमने आपल्याला मुंबईत एक फिल्म आणि डॉक्युमेंट्री शूट करायची असल्याचे कारण सांगून परत मुंबईत जाण्याची परवानगी न्यायालयात मागितली. तदनंतर, न्या. शानूर अवदी यांनी अतिरिक्त हमीच्या अटीवर त्यांना गोवा सोडण्यास शुक्रवारी मंजुरी दिली.
https://www.instagram.com/p/CGPr-Kypqzw/?utm_source=ig_web_copy_link
तेव्हा पूनम आणि सॅमच्या वतीने बाजू मांडताना अॅड. बायरन रॉड्रिग्स यांनी, त्या दोघांचे गोव्यात घर नसून त्यांना हॉटेलमध्ये राहावे लागते. संचार स्वातंत्र्य हा कोणाचाही मूलभूत अधिकार आहे. कुणा व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला तरी त्यांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेता येणे शक्य नाही, असा दावा केला होता.
https://www.instagram.com/p/CFT7Qf7Jyn4/?utm_source=ig_web_copy_link