पार्किंगच्या वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपळे गुरव येथील जवळकरनगर मध्ये पार्किंगच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली असू  याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

हरिष प्रकाश पिल्ले (३९, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सागर आनंदा रसाळ (२९), आनंदा हरिभाऊ रसाळ (५२), नीलम आनंदा रसाळ (५०, तिघे रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिल्ले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पिल्ले हे त्यांच्या नेहमीच्या जागेवर कार पार्क करीत असताना सागरने त्यांना हटकले. त्यांच्यात पार्किगच्या जागेवरून वाद सुरु झाला. या वादातूनच आरोपींनी आपसात संगनमत करून पिल्ले यांना मारहाण केली. यावेळी पिल्ले यांच्या आई मध्यस्थी करण्यासाठी आल्या असता त्यांनाही मारहाण केली.

सागर आनंदा रसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हरीश प्रकाश पिल्ले, रमनी प्रकाश पिल्ले (५९, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हरीश पिल्ले याने रसाळ यांची अॅक्टिव्हा दुचाकी खाली पाडली. याचा रसाळ यांनी पिल्ले याला जाब विचारला. त्यावरून पिल्ले याने रसाळ यांना शिवीगाळ करून ‘तुझ्याकडे पाहून घेईन’ अशी धमकी दिली. यावेळी रसाळ यांच्या आई मध्यस्थी करण्यासाठी आल्या असता पिल्ले याच्या आईने त्यांना मारहाण केली. तसेच रसाळ यांच्या डोक्यात दगड मारून जखमी करत वडिलांना देखील मारहाण केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like