दात व्यवस्थित घासत नसाल तर होतील ‘हे’ आजार, जाणून घ्या माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  शरीर स्वच्छ ठेवणे हे जसं निरोगी आरोग्यासाठी महत्वाचे आहे, तसेच दात स्वच्छ ठेवणे देखील निरोगी आरोग्यसाठी आवश्यक आहे. जर दात घासण्यात किंवा ते स्वच्छ ठेवण्यात दुर्लंक्ष केले तर जीवघेणे आजार देखील होऊ शकातात. त्यामुळे डॉक्टर्स दात कसे घासावेत? हे दखील समजून सांगतात. त्यामुळे दात व्यवस्थित घासणे आवश्यक आहे… बरं का?

दिवसभरातील कामे पटापट करायची असेल किंवा लवकर घराबाहेर पडायचं असेल तर घाईघाईत दास घासून अटोपण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. आणि कालांतराने दात दुखतो, दात किडला असे अनेक बाबींची तक्रार घेऊन डॉक्टर्सकडे जात असल्याचे आपण पाहिले असेलच.

ब्रशिंग म्हणजेच दात घासण्याला एक रूटीनचा भाग मानले जातो, म्हणून कसेही घाईघाईने ब्रश करता का? किंवा रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करायला विसरत आहात का? तसेच विकेंडला आळस करून ब्रश न करताच नाश्ता-चहा घेता का? जर असे करत असाल तर, वेळीच सावध व्हा.

नुकत्याच केलेल्या संशोधनातून समोर आले आले आहे की, तोंडाचे आरोग्य व्यवस्थित नसेल तर लिव्हरचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो, तोही 75 टक्क्यांनी.

काय सांगतं संशोधन?

युकेच्या बेल्फास्ट इथल्या क्वीन्स युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी सुमारे 4 लाख 70 हजार लोकांवर संशोधन केले. त्यांच्याकडे आढळलेल्या डेटाचे विश्लेषणही केले. यात ओरल हेल्थ कंडीशन आणि पोटाशी निगडीत असणारे कॅन्सरचे आजार आढळलेत. जसे की लिव्हर कॅन्सर, रेक्टम कॅन्सर आणि पॅन्क्रिआटिक कॅन्सर हे होय. मात्र, यांच्यात काय कनेक्शन आहे हे देखील आणप जाणून घेऊ , दात व्यवस्थित नाही घासले तर तोंडाशी निगडीत कॉमन समस्या उद्भवतात. जसे की, तोंडात फोड येणे, हिरड्यांमध्ये सूज येणे, दात सैल होणे आदी.

काय निघाला निष्कर्ष?

या संशोधनात पोटाशी संबंधी इतर कॅन्सर आणि खराब ओरल हेल्थ यांचा काहीही संबंध आढळला नाही. पण, हेपाटोबायलरी कॅन्सर आणि ओरल हेल्थ यांच्या संबंध आढळला. इतकेच नव्हे तर, खराब ओरल हेल्थमुळे कॅन्सर नव्हे तर हृदयरोग, मधुमेह आदी समस्यांचा धोका अधिक असल्याचे आढळले. याप्रकारे 6 वर्ष या संशोधनातून असे समजले की, या रिसर्चमध्ये सहभागी 4 लाख 70 हजार लोकांपैकी 4 हजार 69 लोकांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सर झाला आहे. मात्र, यातील्या केवळ 13 टक्के जणांना खराब ओरल हेल्थची समस्या होती.