मुंबईत एसटीची सेवा देणार्या कर्मचार्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण, व्हिडीओ व्हायरल
मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन- राज्याच्या विविध भागातून मुंबईत सेवा बजावण्यासाठी दाखल झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांना ((ST) कर्मचाऱ्यांना उघड्यावर झोपावं लागत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. अशातच आता एसटी कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा देखील निकृष्ठ असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल( poor-quality-food-serving-for-st-employees video-goes-viral) झाला आहे. कुर्ला, मुंबई येथील हा व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात देखील कर्मचारी आपल कर्तव्य (-during-covid-19)निभावत आहेत. अगोदरच 3 महिन्यांच वेतन नसल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या कर्मचाऱ्याला जेवण देखील योग्य मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुंबईत लोकल सेवा अद्याप सर्वांसाठी खुली नाही. त्यामुळे बेस्टवर प्रचंड ताण येत होता. अशातच बेस्टच्या मदतीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून एसटीच्या विविध विभागातून एसटी बसेस आणि सोबत त्या-त्या भागांतील एसटीचे काही कर्मचारी देखील सध्या मुंबईत सेवा देण्यासाठी हजर राहिले आहेत. मुंबईत आलेल्या या एसटी कर्मचाऱ्यांची राहण्याची, जेवणाची उत्तम सोय केल्याचा दावा एसटी प्रशासन गेल्या अनेक दिवसांपासून करत आहे. परंतु, सोशल मीडियावर एसटी कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या जेवणासंदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे एसटी प्रशासनाच्या दाव्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वीचा हा व्हिडीओ आहे.
कर्मचाऱ्यांना जेवणासाठी आणलेला भात योग्य नसल्याचं या व्हिडीओत उपस्थित कर्मचारी सांगत आहेत. हा भात शिळा असून त्याला वास येत असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. असे अन्न खाऊन आम्ही आजारी पडायचं का? असा संतप्त सवालही या व्हिडीओत कर्मचारी विचारत आहेत. दरम्यान, एसटी प्रशासन आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत खरोखरच किती गंभीर आहे. हे या व्हिडीओ वरून स्पष्ट होतय, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे.