बारामतीतील शेतमजूर महिलेची अशी ‘ही’ दानशूरता

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – शासकीय हॉस्पिटलमधील गैरसोयी, तेथील रुग्णांच्या तक्रारीचा वाचला जाणारा पाढा, डॉक्टरांची गैरहजेरी अशाच बातम्या नेहमी चर्चेला असतात. सरकारी हॉस्पिटलमधील उपचार फुकट देतात म्हणजे आमच्यावर उपचार करत नाही, अशी बहुतांशी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची भावना असते. पण तेथील लोकही रुग्णांना बरे होण्यासाठी मदत करत असतात. त्यांच्याविषयी व हॉस्पिटलविषयी कृतज्ञता बाळगणारे तसे कमीच. बारामतीतील एका शेतमजूर महिलेने आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन हॉस्पिटलमधील रुग्णाला उपयोगी पडेल अशी भेटवस्तू देऊन सर्वांना एक नवी दिशा दाखविली आहे.

शेतात काम करताना विषारी साप चावल्याने अत्यवस्थ झालेल्या शेतमजुर महिलेला बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातील डॉक्टरांनी जीवदान दिले. प्रयत्नांची शिकस्त करुन त्या महिलेला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले. सरकारी रुग्णालय असल्याने सर्व उपचार मोफत मिळाले. मात्र, रुग्णालय आणि डॉक्टरांच्या ऋणातून उतराई होण्याचा रुग्ण महिला आणि तिच्या शेतमजुरी करणाऱ्या पतीने प्रयत्न केला. दांपत्याने रुग्णालयातून ‘डीस्चार्ज’ घेताना येथे येणाऱ्या इतर रुग्णांना उपयोगी पडणारे वैद्यकीय उपकरण पल्स ऑक्सिमीटर रुग्णालयाला भेट दिला. मजुर दांपत्याची दानशुरता रुग्णालयाच्या कौतुकाचा विषय ठरली.

बारामती तालुक्यातील पिंपळी येथील बुशरा गफुर इनामदार (वय २६) या विवाहितेला ३० जुन रोजी सकाळी विषारी सापाने शेतात काम करताना दंश केला. बुशरा यांना तातडीने सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. रुग्णालयात आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने उपचार करण्यास सुरवात केली. बुशरा यांच्या साप चावलेल्या हाताला सुज येण्यास सुरवात झाली होती. वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तज्ज्ञ डॉ. अंजली खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रणजित मोहिते, डॉ. दशरथ चवरे, डॉ. अमित कोकरे, डॉ. रोहन खवटे यांच्यासह परिचारीकांनी उपचार करण्यास सुरवात केली.

बुशरा यांनी केलेल्या वर्णनानुसार त्यांना घोणस हा विषारी साप चावल्याचे निदान करुन त्यानुसार उपचार सुरु करण्यात आले. त्यांना शनिवार (दि.६) पर्यंत एकुण ४० विषप्रतिबंधात्मक इंजेक्शन देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या शरीरातील विष प्रभावीपणे निकामी होण्यास मदत झाली. शनिवारी बुशरा यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. सरकारी दवाखान्यात त्यांना मोफत उपचार मिळाले. मात्र, खासगी रुग्णालयातील खर्चाची तुलना करता त्यांना दीड लाख रुपये त्या उपचारासाठी खर्च करावेच लागले असते.

रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या वेळेवरील उपचारामुळे जीव वाचल्याचे समाधान आणि जाणीव या दांपत्याने ठेवली. त्या ऋणातून एखादी वस्तु देवुन मुक्त होवु शकत नाही. मात्र, त्या ऋणाचे ओझे हलके करण्यासाठी इतर रुग्णांना मदत होईल, यासाठी त्यांनी रुग्णालयाला पल्स ऑक्सिमीटर भेट दिला. मजुर दांपत्याच्या दानशुरतेची रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये कौतूकाची चर्चा होती. या प्रकारे शासकीय हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार घेणाऱ्या रुग्णांनी आपल्या परीने मदत केली तर पुढे येणाऱ्या रुग्णांच्या ते अधिक सोयीचे होऊ शकते.

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’