मंगळसूत्र ‘गहाण’ ठेवून खरेदी केला TV, कारण जाणून कराल आईला ‘सलाम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे देशभरातील शाळा व महाविद्यालये अनेक महिने बंद आहेत. अशा परिस्थितीत मुले टीव्ही व ऑनलाइन वर्गातून शिक्षण घेत आहेत. मात्र, गरीब असल्याने एक स्त्री आपल्या मुलास शिक्षणासाठी टीव्ही घेऊन देऊ शकत नव्हती. यांनतर तिने जे केलं हे जाणून घेतल्यावर आपण त्या आईला अभिवादन कराल. त्या गरीब आईने मुलांच्या शिक्षणासाठी मंगळसूत्रदेखील तारण ठेवले. मंगळसूत्र तारण केल्यानंतर महिलेने त्या पैशातून टीव्ही सेट विकत घेतला.

हे प्रकरण कर्नाटकातील गडग जिल्ह्यातील आहे. गडागच्या नागानूर गावात राहणारी कस्तुरी चलवदी यांनी आपल्या चार मुलांच्या शिक्षणासाठी एक दूरदर्शन संच खरेदी करण्यासाठी बारा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र गहाण ठेवले. मुले दूरदर्शनवर प्रसारित केलेले वर्ग वाचू आणि पाहू शकतील, म्हणून त्यांनी हे केले. तहसीलदारांना याची माहिती मिळताच त्यांनी अधिकाऱ्यांना याची चौकशी करण्यासाठी गावी पाठविले. हे प्रकरण वाढतांना पाहून ज्या व्यक्तीने मंगळसूत्र तारण ठेवण्यासाठी पैसे घेतले होते, तो ते परत करण्यास तयार झाला. त्यांनी सांगितले कि, जेव्हा कुटुंबीय पैसे परत करण्यास सक्षम असतील , तेव्हा त्यांनी द्यावे.

कस्तुरी चलवदी म्हणाल्या की, आता त्यांची मुले दूरदर्शन पाहून अभ्यास करतात. आमच्याकडे टीव्ही नव्हता, त्यामुळे मुले इतरांच्या घरी जात असत. शिक्षकांनी सांगितले टीव्ही पहा. मुलांचे भविष्य धोक्यात होते. कोणीही कर्ज दिले नाही, म्हणून मी ठरविले कि, मंगळसूत्र गहाण ठेवून टीव्ही आणेल.

दरम्यान, महिलेचा पती मुत्तप्पा हा रोजंदारीवर काम करणारा मजूर आहे. कोरोनामुळे त्याला कोणतेही काम मिळत नव्हते. त्यांची मुलं सातवी व आठवीत शिकत आहेत आणि ते टीव्हीमुळे शिकू शकत नाही. त्याची मोठी मुलगी विवाहित आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर स्थानिक लोकांनी गरीब महिलेला टीव्ही खरेदी करण्यासाठी पैसेही गोळा केले. एवढेच नाही कॉंग्रेसचे आमदार जमीर अहमद यांनी 50000 रुपये आणि मंत्री सीसी पाटील यांनी कुटुंबाला 20 हजार रुपये दिले. या प्रकारच्या समर्थनामुळे कुटुंब खूप आनंदित आहे.