बाथटबमध्ये अंघोळ करत ‘पॉप स्टार’ ‘मॅडेना’नं पाजळलं ‘कोरोना ज्ञान’ ! ट्रोल झाल्यावर व्हिडीओ केला डिलीट (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकन पॉप स्टार मॅडोना एका वादग्रस्त व्हिडीओमुळं चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओनं बराच गोंधळ झाला आहे. कोरोना व्हायरसबद्दल मॅडोनानं एक व्हिडीओ पोस्ट केला होता. कोरोना व्हायरस या महामारीला तिनं ग्रेट इक्वलाईजर असंही म्हटलं होतं.

https://www.instagram.com/p/B-HBtDLgtkO/

व्हिडीओबद्दल बोलायचं झालं तर तिनं एका मिल्की वॉटर ओआणि गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेल्या बाथटबमध्ये ती बसली होती. तिची अंघोळ सुरू होती. बॅकग्राऊंडला छान पिआनो म्यझिकही सुरू होतं.

https://www.instagram.com/p/B-HCjiLJf-h/

व्हिडीओ मॅडोना म्हणत होती की, कॉविड 19 बद्दल एक सांगायचं आहे. तुम्ही कितीही श्रीमंत, प्रसिद्ध, फनी किंवा स्मार्ट असलात, तुमचं वय कितीही असलं तरी हे सगळ्यांना एकाच लेवलला आणणार आहे. याच्याबद्दल एक चांगली बाब अशी आहे की, यानं सर्वांना एकसारखंच बनवलं आहे. सर्वांना एकाच लेवलवर आणलं आहे. आपण एकाच जहाजावर आहोत हे जहाज जर बुडलं तर सर्वच बुडून जाऊ” असंती ती म्हणाली होती.

https://www.instagram.com/p/B-G-4IPApBL/

मॅडोनाची ही गोष्ट चाहत्यांनाा काही पटली नाही. यानंतर एकच सर्वांच्या कमेंटचा पाऊस सुरू झाला. एकानं कमेंट केली सॉरी क्वीन आपण एक नाही होऊ शकत. आपण एकाच आजारनं मरू. फक्त जो गरीब असेल तो जास्त त्रासाने मरेल. एकानं तर तिला या व्हिडीओसाठी मुर्खातही काढलं. खूप वाद झाल्यानंतर आणि ट्रोल झाल्यानंतर मॅडोनानं तिचा हा व्हिडीओ डिलीट केला आहे.

https://www.instagram.com/p/B9mgTiKoIiq/

https://www.instagram.com/p/B9MyRAthox3/

https://www.instagram.com/p/B8MCyIIHjhq/

https://www.instagram.com/p/B6F34lZBBHP/

https://www.instagram.com/p/B6EuN1ZBe03/

https://www.instagram.com/p/B5GmQh8hHsg/