Alert : ‘पॉपकॉर्न’ खाल्ल्यामुळं असं झालं इन्फेक्शन, करावी लागली 7 तास ‘हार्ट’ची ‘सर्जरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॉपकॉर्न खायला कोणाला आवडणार नाही. जेव्हा लोक चित्रपट पाहण्यासाठी जातात तेव्हा ते प्रथम पॉपकॉर्न खरेदी करतात. मुलांसाठी हा आवडता टाईमपास स्नॅक आहे. परंतु, त्यासंबंधित एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ब्रिटनमधील एका व्यक्तीला पॉपकॉर्न खाऊन हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागली.

काय आहे संपूर्ण प्रकरण :
या व्यक्तीने सांगितले की, त्याला पॉपकॉर्नच्या एका दाण्यामुळे त्याला एवढ्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले कि त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार ही व्यक्ती ब्रिटनमधील अग्निशमन दलाशी संबंधित आहे. जेव्हा तो आपल्या पत्नीसोबत पॉपकॉर्न खात चित्रपट पाहत होता. परंतु पॉपकॉर्न खाता खाता त्याच्या दातात अडकला, त्याने तो काढण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण तो थोडा दात अडकला. त्यांनी सर्व गोष्टींचा वापर करत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हळू हळू त्याचा दात दुखू लागले. नंतर त्याला अस्वस्थ, थकवा आणि डोकेदुखी जाणवू लागली. जेव्हा समस्या वाढली तेव्हा डॉक्टरांनी त्याला एंडोकार्डिटिस असल्याचे सांगितले. हा हृदयाच्या संसर्गाचा एक प्रकार आहे, जो तोंडातून किंवा शरीराच्या इतर ठिकाणी असलेल्या रक्त पेशींमध्ये बॅक्टेरियांमुळे होतो.

हृदय शस्त्रक्रिया :
या व्यक्तीचे म्हणणे आहे की पॉपकॉर्न दात अडकल्याने आणि ती काढण्यासाठी बर्‍याच गोष्टी वापरल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. हिरड्या खराब झाल्या आणि बॅक्टेरिया त्यांच्या रक्तपेशींद्वारे हृदयापर्यंत पोहोचला. या स्थितीवर मात करण्यासाठी, त्या व्यक्तीस ओपन हार्ट शस्त्रक्रिया करावी लागली, जी 7 तास चालली. त्यामुळे एक पॉपकॉर्नचा दाना त्यांना खूप महागात पडला.

फेसबुक पेज लाईक करा –