‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ‘पोप फ्रान्सिस’ यांनी मागितली माफी

व्हॅटिकन सिटी : वृत्तसंस्था – आशीर्वादाच्या अपेक्षेने पोपचा हात हातात घेऊन तो तसाच धरुन ठेवणाऱ्या एका महिलेवर पोप भडकले. त्यांनी महिलेच्या हातातून आपला हात सोडवून घेण्यासाठी महिलेच्या हातावर फटका मारला. महिलेच्या हातून आपला हात सोडवून घेताना रागाने तिच्या हातावर फटका मरणारे पोप फ्रान्सिस यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आपला संयम अनेक वेळा संपतो, माझासुद्धा ! असे म्हणत पोप यांनी अज्ञात महिलेची माफी मागितली आहे.

व्हॅटिकन सिटीमध्ये नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पोप त्यांच्या दर्शनासाठी जमलेल्या भक्तांची भेट घेत होते. ख्रिश्चन धर्मातल्या प्रथेनुसार, पोप यांनी आपला हात हातात घेऊन आपल्याला आशिर्वाद द्यावेत असे वाटत असते. शक्य होईल तेवढ्या लोकांचा हात हाता घेत पोप संवाद साधत होते. एका महिलेने पोप यांचा हात घट्ट धरून ठेवला. ती तो सोडायला तयार नव्हती. पोप यांचा हात महिलेने घट्ट पकडून ठेवला. तेव्हा पोप यांनी रागाने दुसऱ्या हाताने मारलं आणि आपला हात त्या महिलेच्या हातातून सोडवून घेतला.

महिलेच्या हातातून आपला हात सोडवून घेताना पोप यांनी महिलेच्याा हातावर मारलेल्या फटक्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अखेर पोप देखील माणूस आहेत अशी प्रतिक्रिया काही युजर्सनी दिली. पोप यांनी या कृतीबद्दल माफी मागितली आहे. So Many times we lose patience, even me असे म्हणत त्यांनी अज्ञात महिलेची माफी मागितली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/