पोप फ्रान्सिस यांचं पुन्हा एकदा मॉडेलच्या फोटोला ‘लाईक’, सोशल मीडियात चर्चेला उधाण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस (Pop Francis) हे पुन्हा एकदा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी मॉडेल नतालिया गॅरिबोट्टो (Natalia Garibotto) हिचा एक बोल्ड फोटो लाईक केला होता. त्यानंतर जगभरात उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. या चर्चा थांबत नाहीत तोच ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पोप फ्रान्सिस यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मॉडेल मार्गोट फॉक्स (Model Margot Foxx) हिच्या एका सेक्सी फोटोला लाईक करण्यात आलं आहे. एका युझर्सने हे ट्विट करत शेअर समोर आणलं आहे.
https://twitter.com/snyyrid/status/1341163782756855810
ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर लोक पोप फ्रान्सिस यांचे वार्षिक संबोधन ऐकण्यासाठी आतुर आहेत. मात्र, ते आता वेगळ्यात प्रकरणात सापडले आहेत. मॉडेल मार्गोट फॉक्स हिने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती फीट कपड्यांमध्ये आपलं अंगप्रदर्शन करत आहे. पोप फ्रान्सिस यांनी या फोटोला लाईक केले. त्यानंतर फॉक्सला खूप आनंद झाला. तिने ट्विट करत म्हटले की, माझ्या फोटोला कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांनी लाईक केलं आहे, आता मी स्वर्गात जाईन.
the pope liked my picture that means i’m going to heaven 😌
— Margot 🦊 (@margot_foxx) December 22, 2020
पोप फ्रान्सिस यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून हातळण्यात येत असण्याची शक्यता आहे. मात्र, इंटरनेटच्या नजरेतून काहीही सूटू शकत नाही. पोप फ्रान्सिस आणि त्यांनी लाईक केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मार्गोट फॉक्स हिचे इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट असल्याने पोप फ्रान्सिस यांनी या फोटोला डिस लाईक केले का याची माहिती कळू शकली नाही. पोप फ्रान्सिस यांनी फॉक्सचा फोटो लाईक केला असो किंवा नसो, मात्र सोशल मीडियावर हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला आहे.