Popular Front of India (PFI) | PFI वर दुसरी मोठी कारवाई ! 7 राज्यांत 200 ठिकाणांवर छापे; 170 जण ताब्यात, पुण्याच्या कोंढाव्यातून 6 जणांची धरपकड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इडिया (Popular Front of India (PFI) विरोधात तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई सुरु आहे. मंगळवारी (दि.27) सकाळच्या सुमारास तब्बल 7 राज्यांमध्ये पोलिसांनी छापे (Police Raid) टाकले. आत्तापर्यंत सुमारे 170 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी (Inquiry) सुरु आहे. यापूर्वी NIA आणि ED ने 13 राज्यांत छापे टाकून 100 अधिक पीएफआय (Popular Front of India (PFI) कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. दहशतवाद्यांना निधी उपलब्ध (Terrorists Funding) करुन देण्यासंदर्भात छापे टाकले जात आहेत. दरम्यान, पुण्याच्या कोंढवा परिसरातून 6 ते 7 जणांना ताब्यात घातल्याची माहिती समोर येत आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, सध्या पोलीस उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), गुजरात (Gujarat), आसाम (Assam), कर्नाटक (Karnataka), दिल्ली (Delhi) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) तपास करत आहेत. हिंसक निदर्शनांच्या नियोजनासंदर्भात इनपुट मिळाल्यानंतर छापे टाकण्यात आले. वरिष्ठ गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजेपर्यंत 7 राज्यात 200 ठिकाणांवर छापे टाकून 170 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी एजन्सिज, भाजप (BJP) तसेच RSS च्या नेत्यांना
आणि संघटनेला निशाणा बनवण्याचा पीएफआयचा (Popular Front of India (PFI) प्लॅन होता.
असे एका इंटेलिजन्स नोटमध्ये (Intelligence Note) समोर आला आहे.
या नोटनुसार, आपल्या वरिष्ठ नेत्यांना नवी दिल्लीतील तिहार जेलमध्ये (Tihar Jail) ठेवल्यामुळे पीएफआय
कार्यकर्ते नाराज आहेत.

तसेच सरकारला प्रत्युत्तर म्हणून पीएफआयने हिंसक कारवाईच निर्णय घेतल्याचेही या नोटमध्ये नमूद करण्यात
आले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, यासाठी पीएफआयने ‘बयाथीस’चा मार्ग निवडला आहे.
बयाथीस हा एक अरबी शब्द असून याचा अर्थ ‘मौत का सौदागर’ किंवा ‘फिदायीन’ असा होतो.

Web Title :- Popular Front of India (PFI) | big crackdown on pfi once again raids on 200 locations in 7 states more than 170 people in custody, 6 detained from pune kondhwa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Encroachment On Hills In Pune | येवलेवाडी परिसरात ‘डोंगरफोड’ करून ‘ओढे बुजवून’ वेगाने विकास कोट्यवधी रुपये खर्चून केलेले रस्ते कायमच ‘खड्डयात’; बांधकाम व्यावसायाला चालना देण्यासच अनियोजीत रस्त्यांच्या ‘घाट’

Pune Crime | धक्कादायक! पुण्यात सहा दिवसाच्या लेकीची निर्दयी बापाने केली तृतीयपंथीयांना विक्री