Popular Front of India (PFI) | PFI च्या रडारवर कोण कोण होतं? महाराष्ट्र ATS कडून खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पीएफआय टेरर फंडिंग प्रकरणी एनआयएने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front of India (PFI) देशभरातील अनेक कार्यालयांवर छापेमारी केली. महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) केलेल्या चौकशीदरम्यान PFI (Popular Front of India) च्या निशाण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) नागपूरमधील मुख्यालय (RSS Headquarters Nagpur) आणि भाजपचे ज्येष्ठ नेते (Senior BJP Leader) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

PFI देशातील मोठे RSS आणि BJP नेत्यांवर हल्ला करण्याचा प्लान आखत होते, अशी माहिती सांगितली जात आहे. PFI च्या सदस्यांनी RSSची दसऱ्याच्या दिवशी होणारे पथ संचालनाची माहिती जमा केली आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय एजन्सी NIA, CRPF आणि राज्य ATS ने संपूर्ण देशात 10 राज्यांमध्ये PFI शी संबंधित लोकांवर छापेमारी करत अनेक लोकांना अटक केली.

 

पीएफआयच्या ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांकडून चौकशीतून आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.
त्यादृष्टीने एटीएसकडून तपास सुरु आहे. PFI च्या कार्यकर्त्यांनी या कारवाईनंतर आकांड तांडव करत अनेक ठिकाणी आंदोलने केली.
या संघटनेत सामील होणाऱ्या सदस्यांची नोंद ठेवली जात नाही. यामुळे संघटनेशी संबंधीत लोकांचा शोध घेणे यंत्रणेसमोर मोठं आव्हान आहे.

 

Web Title :- Popular Front of India (PFI) | rss and bjp leaders targeted by pfi sangh hq also on radar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Champa singh Thapa | बाळासाहेबांच्या ‘सावली’नेही सोडली उद्धव ठाकरेंची साथ, ‘मातोश्रीचा सेवक’ शिंदे गटात

Pune News | अतिवृष्टी नुकसानीपोटी 3 कोटी 18 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त

CM Eknath Shinde | आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात नवरात्रोत्सवाच्या स्वागत कमानींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर