Porn Film Case मध्ये पती राज कुंद्राच्या अटकेने अस्वस्थ झालेल्या शिल्पा शेट्टीनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल

मुंबई : पोर्न व्हिडिओ (Porn Film Case) बनवण्याच्या रॅकेट प्रकरणात मुख्य आरोपी असलेला पती राज कुंद्रा (Raj Kundra) ला काल रात्री अटक झाल्यानंतर (Porn Film Case) अभिनेत्री शिल्पा (Shilpa Shetty) इतकी अस्वस्थ झाली आहे की तिने डान्स रिअ‍ॅलिटी शो ’सुपर डान्सर’ (Super Dancer) चे शूटिंग आज टाळले.

एका हिंदी चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी ठरले होते की, आज शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) जज म्हणून डान्स रिअ‍ॅलिटि शो ’सुपर डान्सर’ (Super Dancer) च्या चौथ्या सीझनच्या दोन एपिसोडचे शूटिंग करेल. परंतु, रात्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टीने शोचे शूटिंग टाळले आहे.

’सुपर डान्स’चे शुटिंग नेहमी दर सोमवारी किंवा मंगळवारी होते आणि वीकएंडच्या दोन्ही एपिसोडचे शुटिंग एकाच दिवशी केले जाते. बदललेली स्थिती पाहता आता शिल्पा शेट्टीच्या गैरहजेरीतच शोचे इतर दोन जज – गीता कपूर आणि अनुराग बासुसोबत शोचे शूटिंग होत आहे.

उल्लेखनीय आहे की कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर जेव्हा शिल्पा आपल्या कुटुंबाच्या अनेक सदस्यांसह स्वता सुद्धा कोरोना संक्रमित झाली होती तेव्हा सुद्धा ’सुपर डान्सर’चे काही एपिसोड तिच्या शिवाय शुट करण्यात आले होते.

पोलिसांचे म्हणणे आहे की, पोर्नोग्राफी व्हिडिओ (Porn Video) बनवण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा
विरुद्ध पुरेसे पुरावे आहे. राज कुंद्राने या बिझनेसमध्ये 10 कोटी रुपये लावले होते. फेब्रुवारीपासून
स्पष्ट झाले होते की, कुंद्रा केंद्रिन कंपनीसाठी काम करत होता. परंतु थेट लिंक नसल्याने क्राईम ब्रँच
तपास करत होती. माध्यमांनी शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रयत्न केले असता कोणतीही प्रतिक्रिया अद्यापपर्यंत मिळालेली नाही.

हे देखील वाचा

PGCIL Apprentice Recruitment 2021 | पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये 1110 पदांची भरती, परीक्षेशिवाय नियुक्ती; जाणून घ्या सविस्तर

Job Alert | राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर इथे होणार मोठी भरती ! परीक्षा नाही थेट मुलाखत, जाणून घ्या मुलाखतीची तारीख

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Porn Film Case | raj kundra arrest shilpa shetty cancels shoot of super dancer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update