Mumbai News : मढ वीचवरील एका बंगल्यात वेब सीरिजच्या नावावर तरूणींची पॉर्नफिल्म बनवायचे, गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  अभिनयाच्या क्षेत्रात नशीब अजमाविण्यासाठी मुंबईत येणाऱ्या तरुणींच्या अश्लील चित्रफिती तयार करणाऱ्या एका पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. मढ बीचवरील एका बंगल्यात छापा टाकून पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. यात दोन अभिनेत्यासह, एक ग्राफिक डिझायनर महिला, फोटोग्राफर आणि कॅमेरामन आदीचा समावेश असून हे सर्व बॉलिवूडशी संबधित आहेत.

वेबसिरीज, शॉर्ट फिल्म तसेच टीव्ही मालिकांत अभिनयाची संधी मिळावी म्हणून अनेक तरुण आणि तरुणी मुंबईत येत असतात. अभिनय क्षेत्रात संधी मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. याच परिस्थितीचा पुरेपूर फायदा बॉलिवूडशी संबंधित काही मंडळी घेत असून उपनगरात बंगले भाड्याने घेऊन त्यांच्या अश्लील चित्रफिती बनवल्या जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाला मिळाली. होती. त्यानुसार, प्रभारी पोलिस निरीक्षक केदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक धीरज कोळी, सहायक निरीक्षक लक्ष्मीकांत साळूंखे, सुनील माने, अमित भोसले, सोनाली भारते यांच्या पथकाने मढ बीचवरील ग्रीन पार्क बंगल्यात छापा टाकला. यावेळी पलंगावर एका अश्लिल चित्रफितीचे शूटिंग सुरु होते. पोलिसांनी पाच जणांना बंगल्यातून अटक केली आहे.