Porn films case | राज कुंद्राचे पाॅर्न व्हिडिओच्या व्यवहारांसाठी 5 WhatsApp ग्रुप
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Porn films case । सोमवारी रात्री उशीरा मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra ) अटक केली. पोर्नोग्राफी (Porn films case) प्रकरणात त्याला (Raj Kundra Arrested) अटक करण्यात आली. राज कुंद्रावर मोबाईल अॅपच्या माध्यमातून पॉर्न चित्रपट तयार करून विकल्याच आरोप आहे. राजविरूद्ध आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राजने आपल्या एका नातलगासोबत मिळून एक कंपनी सुरू केली होती. ही कंपनी पॉर्न कंटेंटसाठी अनेक एजंटला कॉन्ट्रॅक्ट द्यायची, असा देखील आरोप आहे. आता या प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. राजचे WhatsApp चॅट पोलिसांच्या हाती लागलं आहे.
राज कुंद्राने (Raj Kundra) या सर्व रॅकेटचा व्यवहार करण्यासाठी एच अकाउंट्स या नावाने पाच जणांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या व्हॉट्सअॅप (WhatsApp ) ग्रुपमध्ये राज कुंद्रा, मेघा विहान अकाऊन्ट, प्रदीप बक्षी, रॉय डिजिटल मार्केटिंग अकाऊन्ट आणि रॉय इवेन्ट कन्टेट हेड असे 5 जण त्यात समाविष्ट असल्याची माहित पुढं आलीय. तर, या चॅटमध्ये या व्हिडिओमधून कमावलेल्या पैशांचा आकडाही समोर आलाय. यामध्ये एकूण ऑर्डर 1433, एकूण कॉइन्स 3 लाख 32 हजार 483 ,एकूण सेल 4 लाख 40 हजार 363 आणि MTDC सेल 27 लाख 81 हजार 551 असा हिशोब मांडला आहे.
या दरम्यान, आता पॉर्न फिल्म्स प्रकरणी (Porn films case) राज कुंद्रासह आणखी एकाला
पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. रयान जॉर्न थारप असे अटक करण्यात आलेल्या
आरोपीचं नाव आहे. हा आरोपी वेरूळचा राहणारा आहे. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात
(Malvani Police Station) रायन जॉर्न थाँर्प विरोधात गुन्हा नोंदविला आहे. त्याचाही या
प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
Chandrakant Patil | ‘स्वबळावर सरकार स्थापन करणार, चंद्रकांत पाटलांनी आखला ‘हा’ कृती प्लॅन