पोलिसात तक्रार केल्यामुळे मालकीनीकडे शरीर सुखाची मागणी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन

पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून वाहनांवर चालक असलेल्याने मालकीनीला सोशल मीडियावरून अश्लील संदेश पाठवून, शरीर सुखाची मागणी करुन विनयभंग केल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

[amazon_link asins=’B01EU2M62S,B01ELJQSS8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4e64ad77-b680-11e8-94f3-0b8e16a9489d’]

याप्रकरणी वाकड ठाण्यात २७ वर्षीय महिलेने फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रविंद्र बाजू जगताप (३०, रा. तापकीर नगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल असलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे रविंद्र हा वाहनचालक म्हणून नोकरी करत असताना जुलै महिन्यात हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन थांबवून त्याने मालकिणीसोबत बाचाबाची व शिवीगाळ करून चाकुने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला अटकही झाली.

पुणे : मानलेल्या भावाकडूनच विवाहीत बहिणीवर बलात्कार 

मात्र, जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा वेगवेगळ्या मोबाईलवरून फोन करून तसेच व्हॉटस अप, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे संदेश पाठवले. तसेच महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली आणि ती मान्य न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. तपास वाकड पोलीस करीत आहेत.

जाहिरात