Porn on Internet | 3000 रूपये भरा अन्यथा होईल अटक, पॉर्न पाहिल्याप्रकरणी बनावट नोटिसा पाठवून 1000 जणांना गंडवलं, केली 40 लाखाची कमाई

नवी दिल्ली : Porn on Internet | फोनमध्ये पोर्न (Porn) पाहिल्यास पोलीस ताबडतोब नोटीस (police notice) पाठवत आहेत का? कारण, सोशल मीडिया (social media) वर एक नोटीस वायरल होत आहे, जी पोलिसांची असल्याचे म्हटले जात आहे. परंतु सत्य काही वेगळेच आहे. कारण, जेव्हा काही लोकांनी इंटरनेटवर पोर्न सर्च (search for porn on internet) केले तर त्यांच्या ब्राऊजरमध्ये एक पॉपअप (popup) च्या नोटीससह कंटेंट ओपन होत आहे, ज्यामध्ये लिहिले आहे – तुम्ही पोर्न पहात आहात (You are watching porn), हा एक गुन्हा आहे (it is a crime). 3000 रुपये दंड (fine) न भरल्यास तुमचा कम्प्युटर (computer) ब्लॉक (blocked) केला जाईल.

Porn on Internet | fake police notice on watch search porn videos on google internet three arrested

इतकेच नव्हे, तर या फेक नोटीसमध्ये एक QR कोड सुद्धा बनवलेला आहे, जो स्कॅन करून ऑनलाइन पैसे मागितले जात आहेत. यामध्ये लिहिले आहे, तुम्ही भारताच्या कायद्यांतर्गत प्रतिबंधित पोर्नोग्राफी साहित्य (पीडोफिलिया, हिंसा आणि समलैंगिकतेचा प्रचार) साइटवर वारंवार आल्याने ब्लॉक करण्यात आले आहे. तुमच्या निर्णय नंबरनुसार, 3000 रुपयांचा दंड भरावा लागेल. कोणत्याही सोयीस्कर माध्यमातून तुम्ही दंड भरू शकता.

व्हॉट्सअपपासून गुगल पे आणि पेटीएम आणि फोनपे पर्यंत पैसे घेण्यासाठी तिथे एक क्यूआर कोड सुद्धा दिला आहे. सोबतच म्हटले आहे की, दंड भरल्यानंतर कम्प्युटर स्वयंचलित प्रकारे अनब्लॉक केला जाईल. दंड न भरल्यास कम्प्युटरचा पूर्ण डेटा डिलिट करणे आणि ताबतोब घरी पोलीस पाठवून अटकेची कारवाई केली जाईल, अशी धमकी सुद्धा देण्यात येत आहे. सोबतच दंड भरण्याचा कालावधी 6 तास असल्याचे म्हटले आहे.

आता या फेक ‘पोलीस नोटीस’ वर कारवाई करत दिल्ली पोलिसांनी (delhi police) तीन लोकांना
अटक केली आहे. हेच लोक पोलिसांची बनावट नोटीत देत होते. अटक केलेल्या लोकांमध्ये दोन
चेन्नईचे आहेत. सोशल मीडियावरून याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्वतः दखल घेत
केस दाखल केली होती. यामध्ये स्थानिक मास्टमाईंडला अटक केली आहे, त्याचा भाऊ परदेशातून
ही बनावट नोटीस ऑपरेट करत आहे आणि तांत्रिक गोष्टी पहात आहे. या टोळीने तब्बल 1000
लोकांना चुना लावला आहे.

हे देखील वाचा

Pune Police | पुण्यातील पोलिस निरीक्षकानं इंटेरिअर डेकोरेटरच्या कानाखाली पिस्तुल लावल्यानं प्रचंड खळबळ; समर्थ पोलिस ठाण्यात ‘नोंद’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Porn on Internet | fake police notice on watch search porn videos on google internet three arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update