Advt.

‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वसिष्ठच्या पॉर्न सिनेमात काम करण्यासाठी नवोदीत कलाकारांना मिळायचे ‘इतके’ पैसे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वसिष्ठ हिला मुंबई पोलिसांनी नुकतीच पॉर्न फिल्म प्रकरणात अटक केली. पॉर्न व्हिडीओ शुट करून ते स्वत:च्या वेबासाईटवर अपलोड करत असल्याचा आरोप गहनावर आहे. बुधवारपर्यंत सत्र न्यायालयानं गहनाला पोलीस कोठडी सुनावली आहे. गहनावर करण्यात आलेले आरोप तिच्या टीमनं फेटाळून लावले आहेत.

एका वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, गहना नवोदीत स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना हेरायची. त्यांना आमिष दाखवून ती तिच्या पॉर्न सिनेमात काम करून घ्यायची. या कलाकारांना एका पॉर्न सिनेमाम काम करण्यासाठी 15 ते 20 रुपये मिळायचे अशी माहिती तपास अधिकाऱ्यानं दिली आहे.

मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलनं रविवारी अ‍ॅक्ट्रेस गहना वसिष्ठ हिला एक अ‍ॅडल्ट व्हिडीओ शुटींग शेअर केल्या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे अशी माहिती आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, गहनानं 87 अश्लील व्हिडीओ आणि पॉर्न व्हिडीओ शुट केले आहेत आणि तिच्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत. ज्यांनी या चॅनेलची सदस्यता घेतली आहे त्यांना हे व्हिडीओ पाहण्यासाठी 2000 रुपये द्यावे लागतात.

गहनाच्या 3 बँक खात्यात 36 लाख रुपये आहेत. सब्सक्रिप्शनच्या माध्यमातून तिनं ही कमाई केली आहे. तिच्या टीमचं म्हणणं आहे की, गहना वसिष्ठ उर्फ वंदना तिवारी ही निर्दोष असून ती कुठल्याही पॉर्न फिल्मच्या रॅकेटमध्ये सहभागी नाही.