home page top 1

ओळख लवपून पॉर्न पाहणाऱ्या आणि कंटेट अपलोड करणाऱ्या लाखो युजर्सचा खासगी डेटा ‘लीक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डेटा लीक होण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशातच आता एक माहिती समोर आली आहे की, “एका मोठ्या पॉर्न साईटचा डेटा लीक झाला आहे. यात युजरची सर्व खासगी माहिती आहे. Luscious असं या पॉर्न साईटचं नाव असून येथे मोठी गडबड झाली आहे. ही साईट युजरला ओळख लपवून त्यांना पॉर्न फोटो आणि अ‍ॅनिमेशन अपलोड करण्याची सुविधा देते.

vpnMentor या शोधकर्त्यांनी मात्र ही साईट पाहणाऱ्या आणि या साईटवरअ‍ॅडल्ट माहिती अपलोड करणाऱ्यांची माहिती मिळवली आहे. फक्त युजरचीच माहिती नाही तर त्या युजरने काय काय लाईक कमेंट शेअर केले आहे याचीही माहिती त्यांनी मिळवली आहे. सदर माहिती एनक्रिप्टेड नसल्याने हा घोळ झाला आहे. युजरच्या खासगी माहितीमध्ये युजरचा ईमेल, लिंग, देश, त्यांची आवड आदि गोष्टींचा समावेश आहे.

या माहितीचा शोध लावण्यात यश मिळवणाऱ्या संस्थेने सांगितले आहे की, “ही माहिती आमच्या हाती लागली असल्याने ती सुरक्षित आहे. अन्य एखाद्या हॅकरच्या हाती लागली तर या माहितीचा उपयोग, फसवणूक, फिशिंग, डॉक्सिंग अशा प्रकारांसाठी केला जाऊ शकतो. हॅकर एखाद्या युजरला ब्लॅकमेलही करू शकतो. काही ई-मेल आयडी तर युजरचे पूर्ण नाव आहे.”

दरम्यान Luscious ला जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ती कमतरता दूर केली. परंतु वेबसाईट चालवणाऱ्यांनी याबाबत काहीही माहिती दिलेली नाही.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like