Porn Star Dahlia Sky | 600 अ‍ॅडल्ट चित्रपटात काम केलेल्या प्रसिद्ध पॉर्न स्टारचा कारमध्ये सापडला मृतदेह, शरीरावर ठिकठिकाणी गोळीबाराचे व्रण

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कॅन्सरसारख्या घातक आजाराशी लढत असलेली पोर्न स्टार डाहलिया स्काय (Porn Star Dahlia Sky) चा गोळी लागल्याने संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. 31 वर्षाची पोर्न स्टार स्कायचा (Porn Star Dahlia Sky) मृतदेह कारमध्ये सापडला होता आणि तिच्या शरीरावर गोळीची निशाणी होती. डाहलिया स्काय फोर स्टेज ब्रेस्ट कॅन्सरने पीडित होती आणि डिप्रेशनला बळी पडली होती.

अ‍ॅडल्ट व्हिडिओ न्यूजनुसार, स्कायने कारमध्ये स्वताला गोळी मारल्यानंतर पोलिसांनी तिच्या मृत्यूला संभाव्य आत्महत्या समजून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तिचा मृतदेह 30 जूनला लॉस एन्जलिसच्या सॅन फर्नांडो खोर्‍यात एका कारमध्ये सापडला होता.

स्थानिक मीडियाला एलएपीडी गुप्तहेर डेव्ह पेटेक यांनी सांगितले की, तपास आत्महत्येच्या अँगलने सुरू आहे.
असा कोणताही पुरावा मिळालेली नाही ज्यावरून समजू शकते की तिची हत्या झाली आहे किंवा काही चुकीचे घडले आहे.

अ‍ॅडल्ट फिल्म निर्माता हंस यांनी सुद्धा स्कायच्या कॅन्सरच्या समस्येबाबत स्थानिक मीडियाशी चर्चा केली. त्यांनी म्हटले की, आजारादरम्यान मी तिच्याशी जीवनाबाबत अनेकदा बोललो, हे तिच्यासाठी सोपे नव्हते.

त्यांनी म्हटले, डाहलिया स्काय (Dahlia Sky), सुंदर आत्मा,
मजामस्ती करणारी आणि उत्साही मित्र होती.स्कायने आपल्या अ‍ॅडल्ट चित्रपाटांच्या करियरची सुरुवात 2010 मध्ये केली होती.तिचे मूळ नाव बेली ब्लू होते.

चार वर्षापूर्वी तिने आपले नाव बदलून डाहलिया स्काय ठेवले होते.
तिने आपल्या आजराबाबत सोशल मीडियावर लिहिले होते.तिने 600 पेक्षा जास्त अ‍ॅडल्ट चित्रपटांमध्ये काम केले.
तिला फीमेल परफॉर्मर ऑफ द ईयरचे अवॉर्ड सुद्धा मिळाले होते.

Web Title : Porn Star Dahlia Sky | porn star dahlia sky found dead aged 31 with gunshot

हे देखील वाचा

Mumbai : DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’

Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !

El-Colacho Festival | ‘इथं’ भररस्त्यात मुलांना झोपवून वरून उडी मारतो व्यक्ती,
धर्माच्या नावावर भयंकर परंपरा सुरू

COVID 19 मधून बरे झाल्यानंतर तुमची मुले ‘या’ आजारांची शिकार तर होत नाही ना? जाणून घ्या लक्षणे