जगातील सर्वात मोठी पॉर्नस्टार मिया खलिफाची Big Boss मध्ये एन्ट्री ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मराठी बिग बॉस चा सिझन संपल्यानंतर आता सलमान खान चा हिंदी बिग बॉस १३ प्रचंड प्रमावर चर्चेत आहे. सर्वाधिक चर्चा यामध्ये सामील होणाऱ्या स्पर्धकांविषयी होत आहे. ‘बिग बॉस १३’ साठी मिया खलिफाशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी मिया खलिफा नक्कीच चर्चेचा विषय ठरली आहे.

मियाबद्दलच्या चर्चेचे कारण ‘बिग बॉस’ बद्दलचे तिने केलेले ट्विट हे आहे. खरं तर हे ट्विट जुने आहे जे आता व्हायरल होत आहे. मियाने या ट्विटमध्ये लिहिले- ‘मला काही गोष्टी क्लियर करायच्या आहेत. मी चुकूनही भारतात येणार नाही, त्यामुळे ‘बिग बॉस’मध्ये येण्यास मी रस दर्शविला आहे असे कोणी म्हणत असेल तर त्याला त्वरित नोकरीवरून काढून टाकले पाहिजे.’

मिया खलिफाबद्दल बोलायचे झाले तर यावर्षी मार्चमध्ये मिया खलिफाने बॉयफ्रेंड रॉबर्ट सँडबर्गबरोबर लग्न केले आहे. स्वत: मियाने याबद्दलचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांना दाखवले. पॉर्न स्टार बनण्यापूर्वी मिया खलिफाने फ्लोरिडाच्या मियामी येथील एका रेस्टॉरंटमध्ये काम केले होते. येथेच एका व्यक्तीने तिला पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जाण्याची ऑफर दिली.

त्यानंतर काही काळ मियाने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम केले. अत्यंत कमी वेळात ती जगातील प्रसिद्ध अडल्ट स्टार बनली. सध्या तिने पॉर्न फिल्म मध्ये काम करणे सोडले आहे. त्यानंतर तीन वर्षे होऊनदेखील तिचे आयुष्य मात्र पॉर्न संदर्भातच चर्चेत असते.

मियाने वृत्तवाहिनीला सांगितल्यानुसार इंडस्ट्री सोडल्यानंतर तीन वर्षे लोटली तरी तिचे वैयक्तिक असे आयुष्य उरले नाही. ती म्हणाली, “जेव्हा जेव्हा मी सार्वजनिक ठिकाणी जाईन, तेव्हा शरीराला क्लेश देणारा त्रास होतो कारण जेव्हा जेव्हा लोक माझ्याकडे बघतात तेव्हा मला वाटते की लोक माझ्या कपड्यांमधून आरपार माझे शरीर पाहू शकतात.”

आरोग्यविषयक वृत्त