Coronavirus : ‘कोरोना’वर लस बनवणार्‍यासोबत रात्र घालवण्याची पॉन स्टारची ‘ऑफर’

लॉस एंजेलिस : वृत्तसंस्था – कोरोना व्हायसरमुळे जगभरात थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात 2 लाख 19 हजार 033 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून मृतांचा आकडा 8 हजारावर गेला आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी लोकांना घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनकडून देण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, याचा फायदा पॉर्न स्टार्सना चांगलाच होताना दिसून येत आहे.

न्यूयॉर्क मधील एका वृत्तसंस्थेने दिलेल्या एका वृत्तानुसार, जगभरातील लोकांचे आयसोलेशनमध्ये राहणे अथवा अनेकांना क्वारेंटाईन करणे यामुळे पॉर्न स्टार्सना मोठा फायदा होत आहे. सध्या पॉर्न स्टार्सचा व्यवसाय तेजीत आहे. अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरातील पॉर्न स्टार केट केनेडीने म्हणते, वेबकॉम बिझनेससाठी ही चांगली वेळ आहे. कोट्यावधी ग्राहक घरातच आहेत आणि त्यांच्याकडे काहीच काम नाही.

व्हॅक्सीन तयार करणाऱ्यासोबत रात्र घलवणार
केटने म्हटले आहे की, वेब कॅमवर पाहण्यासाठी ती एक महिन्याचे 10 डॉलर घेते. मात्र आता काम फार वाढले आहे. त्यामुळे त्यांची आठवड्याची कमाई 1050 डॉलरवरून 1700 डॉलरवर गेली आहे. मात्र काही असे आहेत त्यांची कमाई कमी आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे त्यांच्याकडे ग्राहक येणे कमी झाले आहेत. या जागतिक संकटामुळे अनेक पॉर्न स्टार्स बेरोजगारही झाले आहेत.

रशीयातील पॉर्न स्टार ल्यूबोव बुशूयेवा हीने म्हटले आहे की, जो कुणी कोरोना व्हायरसची लस (व्हॅक्सीन) तयार करेल त्याच्यासोबत आपण एक रात्र घालवायला तयार आहोत, अशी ऑफर तिने दिला आहे. मात्र, तिने हे वक्तव्य भावनिकतेने दिले, की गांभीर्याने हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एवढेच नाही, तर करोना व्हायरसच्या भीतीमुळे तिला घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे.

पॉर्न हबची प्रमियम सेवा मोफत
प्रसिद्ध पॉर्न वेबसाईट पॉर्न हबने इटलीमधील 3 एप्रिलपर्य़ंत आपली प्रिमियम सेवा मोफत केली आहे. लॉक डाऊनदरम्यान संपूर्ण महिनाभर ही सेवा मोफत राहणार आहे. एवढेच नाही तर आपल्या कमाईचा एक हिस्सा कोरोनाग्रस्तांसाठी मदत म्हणून देण्याची घोषणा केली आहे. ही जगातील सर्वात मोठी पॉर्न वेबसाईट आहे. या साईटला रोज 11 कोटी 50 लाख लोक भेट देतात.